Home महत्वाची बातमी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार नाजूकराव पुंडकर यांच्यावर अज्ञात दोन हल्लेखोरांनी...

प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार नाजूकराव पुंडकर यांच्यावर अज्ञात दोन हल्लेखोरांनी केला गोळीबार केला.

95
0

गंभीर उपचार सुरू…!!

देवानंद खिरकर

अकोट / अकोला , दि. २१ :- प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार नाजूकराव पुंडकर यांच्यावर अज्ञात दोन हल्लेखोरांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता गोळीबार केला. यामध्ये पुंडकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे अकोट शहर पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस वसाहतीतून शुक्रवारी रात्री १० वाजता येत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. तसेच त्यांच्या पाठीवर दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे पुंडकर काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच अकोट शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पुंडकर यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळावर एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे आढळली. याप्रकरणी अकोट शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.