Home मुंबई दोन धर्मात तेढ निर्माण करणारे वारीस पठाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची...

दोन धर्मात तेढ निर्माण करणारे वारीस पठाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्रीकडे तक्रार…!

43
0

मुंबई , दि. २१ :– (प्रतिनिधी) – भायखळ्यातील एमआयएम आमदार वारीस पठाण यांनी दिनांक १५/०२/२०२० रोजी कर्नाटक मधील गुलबर्गा येथील नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधी मुस्लिम आंदोलकांसमोर भाषण हे अत्यंत प्रक्षोभक व चिथावणीखोर पध्द्तीने केलेले असून त्याचे पडसाद मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा परिसरात हिंदू व मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने आणि आनंदात राहत असलेल्या परिसरातील दोन भिन्न समाजात तेढ निर्माण करण्याचे तथा हिंदू-मुस्लिम धार्मिक जातीयच्या नागरिकांच्या मनात हिंसाचे विष पेरण्याचे खटाटोप करणाऱ्या वारीस पठाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री याचेकडे सामाजिक कार्यकर्ते व दक्ष नागरिक जयवंत हनुमंत दामगुडे यांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते जयवंत हनुमंत दामगुडे यांनी केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की,काही वर्षांपूर्वी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय मधील नागपाडा येथील एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पोलिसांना हटवा, हिंदूंचा खात्मा करू असे फुत्कार करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई लटकलेली असतानाच भायखळ्यातील एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी असे विषारी फुत्कार इट का जबाब …..हे आता आम्ही शिकलोय,पण यासाठी एकत्र वाटचाल करावी लागेल.स्वातंत्र्य दिले जाणार नसेल तर ते जबरदस्तीने मिळवायला लागेल.आम्ही स्रियांना पुढे करतो….आता तर केवळ वाघिणी बाहेर पडल्यात ,तुम्हाला घाम फुटलाय मग आम्ही एकत्र आलो तर तुमचं काय होईल,हे समजून जा.१५ कोटी आहोत पण १०० कोटींना वरचढ आहोत हे ध्यान ठेवा असे आहे.काल पासून आजपर्यंत सर्वच भाषेच्या इलेक्ट्रॉनिक्स व प्रेस मिडियात प्रकाशित करण्यात आलेले आहे. तर सोशल मीडिया मध्ये व्हायरल होत आहे. समाजातील एकता, अखंडता,शांतता व बंधुता असताना दोन भिन्न धर्माच्या जातीच्या नागरिकांमध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वारीस पठाण यांच्या विषारी फुत्कार भाषणातील विधानाने देशभरात कोट्यवधी हिंदुस्तानी नागरिकांत संतापाची लाट उसळलेली आहे.

तेव्हा मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा क्षेत्रातील स्थानिक पोलीस ठाण्यात भायखळा मधील एमआयएमचे माजी आमदार व नेते वारीस पठाण यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता १८६०,कलम २९५(अ),१५३(अ),१२४(अ) कलमान्वये गुन्हा तात्काळ दाखल करण्यात येऊन त्यांना मुंबई पोलीस अधिनियम १९५१, कलम ५६(क) नुसार हद्दपार जनहितार्थपणे करण्यात यावे अशी राज्याचे मुख्यमंत्री,गृहमंत्री, मुख्यसचिव, अप्पर मुख्य सचिव(गृह),पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त,अतिरिक्त पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग यांच्याकडे ईमेल व व्हॅटसऍपद्वारे तक्रार करण्यात आलेली आहे.

त्या अनुषंगाने तक्रारदार जयवंत हनुमंत दामगुडे यांना मुख्यमंत्री कार्यालयातून ईमेलद्वारे उत्तर आले आहे की,संबंधीत प्रकरणी योग्य कारवाईसाठी गृहविभागकडे पाठविण्यात आलेली असल्याचे आमच्या वार्ताहराशी दक्ष नागरिक व सामाजिक कार्यकर्ते जयवंत हनुमंत दामगुडे बोलताना सांगितले आहे.

Unlimited Reseller Hosting