Home मराठवाडा श्री गुरुजी रुग्णालय, नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

श्री गुरुजी रुग्णालय, नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

443

नांदेड , दि. २० :- ( राजेश भांगे ) छत्रपती शिवाजी महाराज जयंती व राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. श्री गोळवलकर गुरूजी यांच्या जयंती निमित्त श्री गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, पूर्णा रोड,नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.

तसेच रुग्णालयात आयुर्वेद पंचकर्म विभागाचे उद्घाटन माननीय श्री संजय कौडेगे, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नांदेड जिल्हा सहकार्यवाह श्री हेमंतजी इंगळे व संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी श्री गुरुजी रुग्णालया चे सहसचिव श्री अमोल अंबेकर, डॉ.लक्ष्मीकांत बजाज,श्री संजय बजाज, श्री दीपक पावडे, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वैका चांद रावळकर, डॉ.अरुण महाले,डॉ अमोल चावरे, डॉ.आत्माराम गाडगीळ, डॉ.माया म्याद्पावाड, डॉ. चारुशीला डूडूळे, डॉ सरोजिनी मुपडे, पंचकर्म विभागाचे डॉ.शेखर चौधरी,डॉ. प्रदीप सोमाणी, संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थीत होते.
नांदेड शहर व परिसरातील अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला .