Home महत्वाची बातमी समस्या निवारण दरबारमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या निकाली

समस्या निवारण दरबारमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या निकाली

132
0

ग्रामपंचायत बिबीचा नाविन्यपूर्ण उपक्रम…!!

कोरपना – मनोज गोरे

गडचांदूर , दि. २० :- शिवजयंतीचे औचित्य साधून जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी समस्या निवारण दरबाराचे आयोजन करण्‍यात आले होते. या शिबिरामध्ये शंभरावर ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यात आल्या.
शिबिरात एस.टी. बससाठी लागणारे ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड तयार करणे, संजय गांधी निराधार व इतर योजनेचे अर्ज भरणे, बंद रेशन कार्ड सुरू करणे, नवीन रेशन कार्ड तयार करणे, नवीन वोटिंग कार्ड तयार करणे व यादीत नाव समाविष्ट करणे, जात प्रमाणपत्र विषयक मार्गदर्शन करणे, घरकुल विषयक मार्गदर्शन व इतर समस्या सोडविण्यास संदर्भात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण ३५ ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड ऑनलाईन काढण्यात आले. बिबी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बिबी, धामणगाव, नैतामगुडा, आसन (बु) व गेडामगुडा इत्यादी गावातील एकूण १२४ ज्येष्ठ नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांच्या संकल्पनेतून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Previous articleराजे शिवाजी महाराजाचे संस्कारच आदर्श समाज व्यक्ती निर्माण घडविण्याचा मंत्र.
Next articleश्री गुरुजी रुग्णालय, नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here