भुसावळ मधील भिकारी झाले चकाचक…
आमदार संजयभाऊ सावकारे.नगरसेवक पिंटु कोठारी. बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप परदेशी यांनी केले उपक्रमाचे कौतुक….
अब्दुल कय्युम
औरंगाबाद येथील सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुप तर्फे आज भुसावळ शहरात एक आगळावेगळा उपक्रम व एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली.
गरीब निराधार बेवारस अशा मनोरुग्णांसाठी माणुसकी धर्म अजून जिवंत आहे हे समाजसेवक सुमित पंडित यांनी आज दाखवुन दिले.आज दिनांक 19 रोजी शिवजयंती निमित्ताने शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली सुलक्ष्मी बहुद्देशियय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे सकाळी नऊ वाजता पासून रेल्वे स्टेशन बस स्टँड परिसर या परिसरात असणाऱ्या बेवारस निराधार यांना जमा करून त्यांची दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ करून नवीन कपडे परिधान करून त्यांना माणूस बनवण्याचे कार्य सुमीतभाऊ करत आहे. सुमित भाऊ स्वतः गरीब निराधार नागरिकांना न्याय देण्यासाठी उपस्थित होते त्यांना त्यावेळी भुसावळचे व परिसरातील त्यांचे मित्र दत्तुभाऊ खोडे.डि एस चौधरी. पंडित दादा सनके.संजयभाऊ बोरसे.गजानन क्षीरसागर. कमलाकर माळी. चेतन पाटील. हे उपस्थित होते. व सहकार्य केले..
➖➖➖➖➖
प्रतिक्रिया…..
महाराष्ट्रातील बेवारस निराधार अवस्थेत फिरणाऱ्या भिकाऱ्याला दहा रुपये भेट देणे बंद करा यांचे घर कुठे चुकले त्यांना कामाला लावा त्यांच्या घरी नेऊन त्यांना आई-वडील आहेत का विचारपूस चौकशी करून त्यांच्या घरच्यांकडे स्वाधीन करा त्यांची दाढी कटिंग स्वच्छ आंघोळ करून त्यांना कामाला लावा हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर चालू झालेला आहे आतापर्यंत महाराष्ट्र मध्ये साखरेपेक्षा जास्त बेवारस निराधारांना माणुसकी ग्रुप न्याय दिलेला आहे आणि जो पर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे कार्य अविरतपणे चालू ठेवणार आहे जसे की दूनिया मे आकर कमाया खूप हिरे क्या मोती मगर कफन को जेब नही होती हे सुमित यांचे वाक्य साध्य ठरताना दिसते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा या उक्तीप्रमाणे ते संपूर्ण महाराष्ट्रभर आपले कार्य करीत आहे.
सुलक्ष्मी सेवाभावी संस्था संस्थापक. समाजसेवक सुमित पंडित