Home मराठवाडा प्रेमीयुगलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या…!

प्रेमीयुगलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या…!

347
0

सय्यद नजाकत

जालना , दि. १९ :- विवाहीत असलेल्या दोन युवक-युवतीचे प्रेमसंबंध निर्माण होऊन दोघांनीही झालाडा गळफास घेतल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील हनुमाननगर येथे मंगळवार दि 18 रोजी उघडकीस आली विशेष म्हणजे दोघेही विवाहित असुन दोघांनाही दोन मुले आहेत.याबाबत पोलीस सुञाकडून समजलेली माहीती अशी की अंबड तालुक्यातील रवना येथिल तीस वर्षीय विवाहित अजय श्रीधर मोरे व एक 22 वर्षिय विवाहीत युवती लालवाडी येथिल एका शेतात आसल्याची माहीती शनिवारी अंबड पोलीसांना कळली यावरुन पोलीसांनी विचारपुस केली असता त्यांनी वचननामा लिहुन दिला कि आमच्या दोघांचेही विवाह झालेले असुन दोघांनाही दोन मुले आहेत. परंतु तरीही आमचे प्रेमसंबंध आहेत असे नमुद केलेले आहे या वचननाम्यावर दोघांच्याही स्वाक्ष-या आहेत. आसा वचननमा पोलीसांना लिहुन दिला असल्याचे समजते.
यानंतर दोघे युवक-युवती घनसावंगी तालुक्यातील हनुमान नगर परीसरात शेती काम करण्यासाठी गेले. मंगळवारी दि 18 रोजी हनुमान नगर परीसरातील एका झालाडा गळफास घेऊन अजय मोरे व युवती दोघांचेही मृतदेह आढळुन आले. त्यांचे शवविच्छेदन अंंबड येथिल उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सी डि शेवगन, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोलीस उपनिरीक्षक शेजुळ यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी भेटी दिल्या.

Previous articleAll India Urdu Teachers Association Calls For Improvement On Transfer Policy
Next articleभुसावळ शहरामध्ये आज अनोखी शिवजयंती साजरी….
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here