Home मराठवाडा बोगस बिले काढणाऱ्या नगरसेविकेच्या पती ची चौकशी करण्यात यावी

बोगस बिले काढणाऱ्या नगरसेविकेच्या पती ची चौकशी करण्यात यावी

52
0

उपनगराध्यक्ष शेख युनूस यांची मागणी

सय्यद नजाकत – बदनापूर

जालना , दि. १८ :- बदनापूर नगर पंचायत विविध प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली असून शहरातील पाणी प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 32 बोर पैकी केवळ 12 बोरचे काम करून 32 बोर पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवून 60 लाखाचे बिले नगरसेविकेचा पती असलेल्या कंत्राटदाराने उचलल्याचा आरोप उपनगराध्यक्ष शेख युनूस यांनी करून चौकशीची मागणी केल्याने खळबळ माजली आहे .

शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नगर पंचायत ने शहरातील विविध भागात 32 पाण्याचे बोर घेण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रभाग 12 च्या नगरसेविका मंगल बारगाजे व त्यांच्या पुतन्याच्या एजन्सीला सदर बोर काम देण्यात आले असता त्यांनी केवळ 12 बोर खोदकाम पूर्ण केले व उर्वरित 20 बोरचे काम पूर्ण न करता कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून 60 लाखांचे देयके उचलयाचा आरोप उपनगर अध्यक्ष शेख युनूस लालमिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे .

बदनापूर नगर पंचायत मध्ये मागील काही वर्षांपासून वरिष्ठ अधिकारी वर्ग लक्ष देत नसल्यामुळे अनेक बोगस कामे दाखवून शासनाचा निधी हडप केला जात आहे स्वछता अभियानाचे 1 कोटी 21 लक्ष रुपये आलेले असतांना कागदोपत्री कामे दाखवून देयके अदा केली जात आहे या संदर्भात देखील स्वच्छता सभापती संतोष पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती मात्र जिल्हाधिकार्यानी कोणतीच दखल घेतली नाही पाठोपाठ आता पाणी पुरवठा कामात देखील बोगस देयके अदा केल्याची तक्रार झाल्याने खळबळ उडाली आहे .