Home मराठवाडा अन , त्या माथेफिरुने त्यांचे घरच जाळून टाकले

अन , त्या माथेफिरुने त्यांचे घरच जाळून टाकले

30
0

लाखोंचे नुकसान…!!

अमीन शाह

औरंगाबाद , दि. १८ :- घराशेजारी राहणा-या मुलीला कपडे बदलताना पाहिल्यावरुन वाद झाल्यानंतर माथेफिरु तरुणाने अख्खे घर पेटवून दिले. हा खळबळजनक प्रकार मुकुंदवाडीतील संजयनगरात घडला. एक दिवस अगोदर झालेल्या भांडणातून शेजारी आनंद निकाळजे याने घर पेटविल्याचा संशय कुटुंबाने व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुवुंâदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक उध्दव जाधव यांनी घटनास्थळाला भेद देवून पंचनामा केला.
जालन्यातील नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी संजयनगरातील कुटुंब गेले होते. १५ रोजी रात्री दहाच्या सुमारास कुटुंब घरी परतल्यानंतर त्यांची मुलगी कपडे बदलत होती. तिला कपडे बदलताना शेजारी राहणारा आनंद निकाळजे पाहत होता. त्यावरुन त्या कुटुंबात आणि निकाळजेमध्ये वाद झाला. हा वाद वाढू नये यासाठी जावयाने या घरातील कुटुंबियांना त्याच्या बहिणीकडे राहायला पाठवले.
पहाटे तीनच्या सुमारास घराला अचानक आग लागली. हा प्रकार पाहून घरमालकाने कुटुंबियांशी संपर्क साधला. तसेच घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलीसांना कळविण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांनी घराच्या दिशेने धाव घेतली. पण तोपर्यंत घरगुती साहित्य व कपाटातील दिड लाखांची रोकड (दोन हजारांच्या ७५ नोटा) जळून खाक झालया होत्या याप्रकारानंतर कुटुंबियांच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात संशयित निकाळजेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक दादाराव कोपनर करत आहेत.

Unlimited Reseller Hosting