Home विदर्भ बलात्काराच्या गुन्ह्यात मुख्याध्यापकास शिक्षा…!!

बलात्काराच्या गुन्ह्यात मुख्याध्यापकास शिक्षा…!!

241

रवि माळवी

यवतमाळ , दि. १८ :- पिडीत अल्पवयीन मुलीला शाळेचा मुख्याध्यापक त्याच्या ऑफीस मध्ये बोलावून अनेक दिवसांपासून तिच्यासोबत अश्लिल चाळे करुन तिच्या गुप्तांगाला हात लावीत अश्लिल चाळे करीत होता व कोणालाही सांगतले तर पुन्हा असेच करण्याची धमकी देत होता. याबाबत तिला त्रास झाल्याने तिने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगीतला. मुख्याध्यापकाने शाळेतील अनेक विद्यार्थीनीसोबत असेच प्रकार केले होते. या घटनेची तक्रार पिडीत मुलीच्या आईने बाभुळगांव पोलीस स्टेशनला दिली असता पोलीसांनी आरोपीविरुध्द गुन्हे दाखल केले होते. सदर खटल्याचा निकाल न्यायालयाने दिनांक १८/२/२०२० रोजी देवून आरोपीस शिक्षा सुनावली आहे.
रमेश भाऊराव तुमाने (४७) रा.यवतमाळ असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. पोलीस स्टेशन बाभुळगांव हद्दीतील ग्राम नांदूरा येथील पिडीताची आई यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला कि दि.१०.२.२०१७ रोजी त्यांची मुलगी पिडीत ही शाळेतून घरी परत आलेवर तिच्या आईला म्हणाली की तीच्या गुप्तांगाला त्रास होत आहे. याबाबत पिडीत मुलींने वारंवार अशी तक्रार आईजवळ केली होती परंतू तिने पिडीत हिचे सांगण्याकडे दुर्लक्ष केले होते. पिडीत मुलीची सदर तक्रार नेहमीची असल्याने सायंकाळी पिडीत हिला प्रेमाने विचारपूस केली तेव्हा पिडीत हिने सांगीतले की तिचे शाळेचे मुख्याध्यापक सर हे काहीही कारण सांगून पिडीत मुलीला ऑफीसमध्ये बोलावून तिच्या गुप्तांगाला हात लावत होते व तिचेसोबत अश्लिल चाळे करीत होते. याबाबत कुठेही वाचता केल्यास पुन्हा पुन्हा असा प्रकार करेन अशी धमकी देत होते. असाच प्रकार शाळेतील इतर विद्यार्थीनीसोबत वारंवार मुख्याध्यापकाने केले होते. सदरची माहिती पिडीताचे पालकांना मिळालेवरुन बाभूळगांव पोलीस स्टेशन येथे दिनांक ११.२.२०१७ रोजी अप.क्रमांक ४२/२०१७ स्पे.के.क्र.१६/१७, अप.क्र. ४५/२०१७ स्पे.के.क्र.२४/१७, अप.क्र.४६/२०१७ स्पे.के.क्र.२५/१७, अप.क्र.४४/२०१७ स्पे.के.क्र.२६/१७ व अप.क.४३/२०१७ स्पे.के.क्र. २७/१७ कलम ३७६ (२) (आय) (एन) (एफ), ३५४-अे (१), ५०६ भादंवी व क.६, १० पोक्सो कायद्यान्वये आरोपीविरुध्द गुन्हे नोंद करण्यात आले. सदर गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी करुन तपासाअंती आरोपी विरुध्द आरोपपत्र वि.न्यायालयात दाखल केले होते.
सदरचा खटला विशेष सत्र न्यायाधीश, अतिरीक्त सत्र न्यायालय यवतमाळ येथे वरील नमुद केलेले स्पे.के.क्रमांकानुसार सुनावणी करीता सुरु असतांना विद्यमान मोहिनुद्दीन साहेब, डी जे -१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश यवतमाळ यांनी दिनांक १८/२/२०२० रोजी सदर खटल्याचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये आरोपी यास कलम ३७६ (२) (आय)(एन) (एफ) मध्ये जन्मठेप व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने कारावास, ३५४-अे भादंवि व क.६ पोक्सो. मध्ये ५ वर्षे सश्रम करावास व ३ हजार रुपये दंड, न भरल्यास २ महिने साधा कारावासाची अशी सदर ३ गुन्ह्यामध्ये जन्मठेपीची व २ गुन्ह्यामध्ये ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणात सरकार तर्फे ए.पी.पी.मंगेश गंगलवार यांनी काम पाहीले तर पोलीस हवालदार/१५४५ प्रकाश रत्ने बाभुळगांव पोलीस स्टेशन यांनी कोर्ट पैरवी म्हणुन काम पाहीले.