Home विदर्भ आमदार नितीन देशमुख यांची पळसोद येथे सांत्वन भेट

आमदार नितीन देशमुख यांची पळसोद येथे सांत्वन भेट

107

त्या अपघातग्रस्त भाविकांच्या कुटूंबियांना ७ लाखाची मदत प्रदान..

जफर खान

अकोट , दि. १८ :- प्रगट दिनानिमित्य
दर्शनाकरिता पायी वारीत शेगावला जाणारया दोन भक्तांचा अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांना तातडीने मदतीचा हात म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी अकोट तालुक्यातील पळसोद या गावी येऊन मृतकांच्या कुटूंबियांना ७ लाख रुपयांची मदत १७ फेब्रुवारी रोजी दिली.

अकोट तालुक्यातील पळसोद येथील वारकरी शाम गोपाल तिव्हाणे व विशाल संजय पाटेकर यांचा शेगाव मार्गावर लोहारा नजीक टिप्परने धडक दिल्याने १४ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतकाचे नातेवाईक व पळसोद ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुध्दा केले. हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी याकरिता शिवसेनेच्या वतीने आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पुर्तता म्हणून आमदार नितीन देशमुख यांनी मृतक भक्तांच्या घरी जाऊन कुटूंबियांना शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी ५० हजार रुपये रोख तर कंत्राटदाराकडून प्रत्येकी ३ लाख रुपयांचा धनादेश अशी एकूण ७ लाखाची मदत सुपूर्द केली. यावेळी आमदार नितीन देशमुख व शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी मृतक कुटूंबियांच्या पाठीशी शिवसेना सदैव राहील तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून त्यांना मदत मिळवून देण्याचे सांगितले. यावेळी गोपाल दातकर, राहुल कराळे, श्याम गावंडे, प्रशांत अढाऊ, गोपाल म्हैसने, राजू राठी, तसेच पळसोद चे सरपंच, उपसरपंच व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.