Home सोलापुर प्रभारी तहसीलदार शिरसाट यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार

प्रभारी तहसीलदार शिरसाट यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार

148

सतीश मनगुळे

अक्कलकोट , दि. १८ :- तहसीलचे प्रभारी तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी आपला पदभार स्विकारल्यानंतर सर्वप्रथम येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना सिरसट यांनी आपणही इतर स्वामी भक्तांप्रमाणे एक सर्वसामान्य स्वामी भक्त आहोत. स्वामींच्या वास्तव्याने पुनित असलेल्या अक्कलकोट तहसीलवर तहसीलदार पदाचा कार्यभार पाहताना येथील जनतेच्या सेवेतून एका प्रकारे स्वामी सेवा केल्याचे समाधान आपणास नक्कीच लाभेल असे आशादायी मनोगत व्यक्त केले. यावेळी तलाठी नुरद्दीन मुजावर, संजय सोनटक्के, विकास आळंद, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, महेश मस्कले, संजय पवार, अविनाश क्षीरसागर, विपूल जाधव, स्वामीनाथ लोणारी, महादेव तेली इत्यादी उपस्थित होते.