वागदरी /नागप्पा आष्टगी
अक्कलकोट , दि. १८ :- महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सोलापूर यांच्या मार्फत देण्यात येणारा राज्य शासनाचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार अक्कलकोटचे पत्रकार मारुती बावडे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
हा कार्यक्रम सोलापूर येथील वोरोनोको प्रशालेच्या प्रांगणात सोमवारी पार
पडला.यावेळी जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ,प्रकल्प संचालक अनिलकुमार नेवाळे, अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे,महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती शटगार आदी मान्यवर उपस्थित होते.बावडे हे
गेल्या वीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.ते सोलापूर आकाशवाणीवर देखील वृत्त निवेदक म्हणून कार्यरत
आहेत.आतापर्यंत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडुन सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांना यापूर्वी राज्य शासनाचे उत्कृष्ट लेखनाबद्दल तीन पुरस्कार मिळाले आहेत.त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातून
सर्वत्र अभिनंदन होत आहे.