Home विदर्भ हैद्राबाद येथील वर्ल्डकॉन 20-20 मध्ये डॉ. अंजली गवार्ले यांचा सहभागाबद्दल सत्कार

हैद्राबाद येथील वर्ल्डकॉन 20-20 मध्ये डॉ. अंजली गवार्ले यांचा सहभागाबद्दल सत्कार

116

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. १८ :- येथील सुप्रसिद्ध मुळव्याध, भगंदर तज्ञ डॉ. अंजली गवार्ले यांनी 14 फेब्रुवारी रोजी हैद्राबाद येथे इंटरनॅशनल कोलोप्रोक्टॉलॉजी सोसायटी यांनी 3 दिवसीय वर्ल्डकॉन 20-20 कार्यशाळेचे आयोजन हैद्राबाद येथील पंचतारांकित हॉटेल दि पार्क येथे आयोजित केले होते. या कार्यशाळेत यवतमाळ येथील डॉ. अंजली गवार्ले यांनी सहभाग घेऊन मुळव्याध, भगंदर व गुद विकार या विषयावर आयुर्वेदिक औषधी चिकित्सा व शस्त्रकर्म क्षारसुत्र या विषयावर मार्गदर्शन केले. भारतातून आयुर्वेदिक क्षेत्रातील मार्गदर्शन करणार्‍या मध्ये एकमेव महिला आयुर्वेदिक वैद्यक म्हणून डॉ. अंजली गवार्ले या सहभागी झाल्या होत्या. या कार्यशाळेत यशोदा हॉस्पीटल हैद्राबाद येथे लाईव्ह वर्कशॉप करण्यात आला. या मध्ये ही डॉ. अंजली गवार्ले यांचा सहभाग होता.

या कार्यक्रमात राज्यपाल तामिल साई ह्या प्रमुख अतिथी होत्या तर ऑरगनाईजेशनचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम राव, सचिव लक्ष्मण शास्त्री, कोषाध्यक्ष डॉ. शांती वर्धिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या. इंटरनॅशनल कोलोप्रोक्टॉलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत सहारे, सेक्रेटरी डॉ. लडुकार, डॉ. गोविंद कोंडवाणी आदि प्रामुख्याने उपस्थित होते. संपूर्ण जगभरातील शेकडो सर्जन या प्रसंगी उपस्थित होते. या वर्ल्डकॉन 20-20 मध्ये महाराष्ट्रातून एकमेव महिला डॉक्टर म्हणून डॉ. अंजली गवार्ले यांनी अच्युमेंट केल्याबद्दल आज दि. 17 फेब्रुवारी रोजी यवतमाळ शहरातील विविध सामाजिक संघटना व महिलांनी डॉ. अंजली गवार्ले यांचा मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी लायन्सच्या अध्यक्षा डॉ. शिवाजी पालडीवाल, सचिव शोभा दोडेवार, कल्याण पाठक, प्रतिसाद फाऊंडेशनच्या भावनाताई गवई उपस्थिती.