Home जळगाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी सावन मेढे,...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी सावन मेढे, सचिव संघरक्षक तायडे व खजिनदार धनराज घेटे यांची निवड करण्यात आली

224

रावेर (शरीफ शेख)

रावेर येथील तक्षशिला बुद्ध विहारात दुपारी 12.00 वाजता जयंती समिती गठीत करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या सार्वजनिक जयंती उत्सव समिती रावेर शहर च्या अध्यक्ष पदी सावन मेढे , सचिवपदी संघरक्षक तायडे, तर खजिनदार धनराज घेटे यांची निवड करण्यात आली.

तसेच उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे :- उपाध्यक्ष मिलिंद अवसरमल, सहखजिनदार राहुल डी. गाढे, सहसचिव रुपेश अटकाळे, सदस्य प्रकाश अडकमोल, अमोल तायडे, अक्षय म्हसाने या प्रमाणे करण्यात आली.
सदर बैठकीला मा.नगरसेवक महेंद्र गजरे, कामगार नेते दिलीप कांबळे, अॅड. योगेश गजरे, अॅड.सुभाष धुंदले, नगीनदास इंगळे सर, नगरसेवक जगदीश घेटे, भारिप ता.अध्यक्ष बाळु शिरतुरे,पंकज वाघ, पिंटू वाघ, सुनील शिरतुरे, प्रदीप तायडे, रुपेश गाढे, आशुतोष घेटे, संकीत तायडे, उमेश भालेराव, यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.