Home मराठवाडा गावठी बनावटीच्या पिस्टलसह दोन जणांना अटक

गावठी बनावटीच्या पिस्टलसह दोन जणांना अटक

57
0

सययद नजाकत

जालना , दि. १७ :- सदर बाजार पोलीस ठाण्याचे पो.नि. संजय देशमुख यांना मिळालेल्या माहितीवरुन गुन्हे शोध पथकाने नाकाबंदी करुन गावठी बनावटीच्या पिस्टलसह दोन जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
पो.नि. देशमुख यांना गोपनिय माहिती मिळाल्यावरुन त्यांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना कळवून त्यांच्यासोबत गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांसह घृष्णेश्वर चौक याठिकाण नाकाबंदी करण्यात आली. रविवारी मध्यरात्री मंठा चौफुलीकडून भरधाव वेगात येणार्‍या एम. एच. २२ ए. एम. १६१३ क्रमांकाची कार थांबवून त्यांची विचारपुस केली असता त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्टल आढळून आले.
याप्रकरणी विकास जयराम शिंदे (रा.पांगारकरनगर) व किशोर दामोधर घुगे रा. स्वामी समर्थ नगर यांना अटक करण्यात आली असून त्यांनी ही पिस्टल सुनिल वनारसे याच्याकडून एक वर्षापूर्वी ३० हजार रुपयात खरेदी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी सदरील दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई पोउपविभागीय अधिकारी्र खिरडकर, पो.नि. देशमुख, पोउपनि रुपेकर, बोंद्रे, तेलंग्रे, वाघमारे, पठाडे, पवार, क्षिरसागर आदींनी केली.