Home मराठवाडा एक विवाह सोहळा असाही..!;

एक विवाह सोहळा असाही..!;

127

सययद नजाकत – बदनापूर

जालना , दि. 17 :- तालुक्यातील कायम असणारी दुष्काळी परिस्थिती व इतर गोष्टींचा परिणाम तरुणांमध्येही होत असून वायफळ खर्च टाळण्याकडे युवकांचा कल वाढत चालल्याचे चांगले चित्र ग्रामीण भागातही दिसून येत आहे. तालुक्यातील पाडळी येथील युवकांनी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमातच विवाह लावून याचे एक उत्त्म उदाहरण समाजापुढे दिले.

पाडळी येथील प्रतिक्षा प्रवीण शिंदे या मुलीला बघण्यासाठी धोपटेश्वर येथील विठठल अशोक दाभाडे हा तरुण आला होता. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रम पार पडला. मुलाला मुलगी पसंत आली पुढची बोलणी करण्यासाठी वडीलधाऱ्या मंडळीची चर्चा सुरू झाली. परंतु गावातील तरुण सिध्देश शेळक, कृष्णा सिरसाठ, गजानन दाभाडे, रूषीकेश कोल्हे, योगेश सिरसाठ, राहुल शेळके, नागेश शेळके आदीनी मात्र लग्नावरील वायफळ खर्च टळावा यासाठी आताच विवाह करू अशी भूमिका मांडून ताबडतोब विवाह लावण्याचा आग्रह धरला. युवकांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करून ताबडतोब हा विवाह लावला. या एक दिवसात अचानक झालेल्या विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.