Home सातारा मायणी येथील आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णांना वरदान

मायणी येथील आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णांना वरदान

76
0

मायणी – सतीश डोंगरे

शुगर असलेल्या व्यक्तींच्या जखमा बऱ्या होत नाहीत प्रसंगी शरीराचा एखादा अवयव काढावा लागतो त्यामुळे शुगर पेशंट जास्त घाबरलेले असतो परंतु आयुर्वेदाच्या उपचाराने ऑपरेशन न करता जखम बरी करता येते हे मायणी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील डॉक्टरांनी सिद्ध करून दाखवले आहे याबाबत खास माहिती अशी मोराळे येथील डायबिटीस पेशंट बजरंग नारायण शिंदे वय साठ यांना मोटर सायकल वरून येताना मांडीला टिकाव लागला नंतर ती जखम काळी निळी झाली संपूर्ण मांडीला सूज आली जखमेवर फोड आले ते मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले प्रसंगी त्यांच्या शरीरात इन्फेक्शन असल्याने लक्षात आल्यानंतर अँटिबायोटिक च्या साह्याने इन्फेक्शन कमी केले त्यानंतर आयुर्वेदिक उपचार सुरू केले दररोज कोरफड व कडुलिंब रस यांच्या साह्याने जखमा धुऊन काढून त ताजा कोरफडीचा लेप द्यायला सुरुवात केली जखम झालेली कुजलेली व तीव्र दुर्गंधीयुक्त असल्याने दररोज जखम खरडून काढून लेप दिला जात होता डॉक्टरांनी पाय काढण्याचा सल्ला दिला होता परंतु उमेद न हारता येथील डॉक्टर संदीप माळी एमडी आयुर्वेद यांनी रोपण तेल च्या साहाय्याने उपचार सुरू ठेवले आणि आश्चर्य म्हणजे पंधरा दिवसात हा रुग्ण पूर्ण बरा झाला या रुग्णावर डॉक्टर संदीप माळी अनिल कुंभार, सचिन साळुंखे ,प्रसाद म्हेत्रे नर्शिगस्टॉप यांनी विशेष प्रयत्न केले याबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एम.आर. देशमुख म्हणाले या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये जुनाट आजारावर उपचार करून प्रत्यक्ष मृत्यूला देखील पळवून लावण्याची हिंमत या हॉस्पिटलमध्ये आहे येथील डॉक्टरांनी या विषयात शोध निबंध लिहिले आहेत डॉक्टर संदीप माळी यांनी नुकताच नॉन फिलींग डायबेटिक जखमा या विषयावर प्रबंध सादर केला आहे तरी गरीब गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हानही त्यांनी केले आहे.