Home मराठवाडा शिव जयंती निमित्त पाथ्रीकर कॅम्पस येथे “युगपुरुष शिवगौरव गाथा ” कार्यक्रमाचे आयोजन

शिव जयंती निमित्त पाथ्रीकर कॅम्पस येथे “युगपुरुष शिवगौरव गाथा ” कार्यक्रमाचे आयोजन

42
0

सय्यद नजाकत – बदनापूर

जालना , दि. १७ :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बदनापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांसाठी शिवछत्रपतींचे विचार रूजवण्यासाठी येथील पाथ्रीकर कॅम्पस येथे युगपुरुष शिवगौरव गाथा हा कार्यक्रमाचे आयोजन डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी केले आहे.

बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्प्स येथे दि. 20 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 1.30 पासून युगपुरुष शिवगौरव गाथा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सुप्रसीध्द टी. व्ही. स्टार कुणाल वराळे यांच्या संचाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील नाटयछटा, पोवाडे व शिवगिते या कार्यक्रमात सादर होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. यावेळी औरंगाबादचे सुप्रसीध्द शाहीर विजय काटे यांचे विशेष शाहिरी शिवदर्शन हा कार्यक्रम ही होणार आहे. सदरील कार्यक्रम बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्प्स येथे होणार असून प्रवेश सर्वांसाठी खुला असणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी केले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त शिवप्रेमी जनतेने सहभागी होण्याचे आवाहन निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Unlimited Reseller Hosting