Home मराठवाडा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नोटबंदी व वस्तू सेवा कर या विषयावर...

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नोटबंदी व वस्तू सेवा कर या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र चे आयोजन

35
0

सययद नजाकत

बदनापूर, दि. 17 :- येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नोटबंदी व वस्तू व सेवा कर या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलेला होता. या चर्चासत्रामध्ये राज्यातील वाणिज्य विषयाच्या प्राध्यापकांसह मोठया संख्येने वाणिज्य विषयाच्या अभ्यासक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विविध व्याख्यात्यांनी सेवा कर तथा चलनबंदी या विषयावर भाष्य केले.

येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद़घाटन प्राचार्य डॉ. शिवाजी मदन यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य के. बी. लघाने, डॉ. सय्य्द अझरुददीन, प्राचार्या डॉ. सौ. एम. डी. पाथ्रीकर, क्रीडा संचालक डॉ. एस. एस. शेख, कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर, डॉ. एन. जी. खान, प्रोफेसर डॉ. फरार गौरी नाज, जयश्री सूर्यवंशी, डॉ. काथार, नंदकुमार राठी, डॉ. लहाने आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ . दत्ताभाऊ पाथ्रीकर हे होते. यावेळी बोलताना प्राचार्य मदन यांनी नोटबंदी हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थ्ज्ञेतील काळा पैसा संपुष्टात आणून भ्र्ष्टाचार कमी करण्यासाठी होता तसेच वस्तू व सेवा कर हा सुध्दा करव्यवस्था सुरळीत व सोपी करण्यासाठीच घेण्यात आला होता, परंतु त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी रार्ष्टीय स्तरावर चर्चा होण्याची गरज व्य्क्त केली. यावेळी प्राचार्य के. बी. लघाने यांनीही या विषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी चलनबंदी तथा वस्तु व सेवा कराचे समर्थन करून हे निर्णय अर्थव्य्वस्थ्ज्ञा सुधारण्यासाठी योग्य असल्याचे प्रतिपादन करून सेवा करातील त्रुटी दूर करण्यासाठी चर्चा होण्याची गरज व्यक्त केली. यावेळी डॉ. सय्यद अझरुददीन यांचे बिजभाषण झाले. कार्यक्रमाची रूपरेषा वाणिज्य विभागप्रमुख डॉ. संजय कांबळे यांनी, प्रास्ताविक डॉ. जी. बी. गावंडे यांनी सूत्रसंचलन डॉ. देवेंद्र देशमुख यांनी तर आभार डॉ.सोनवणे यांनी मांडले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. झेड. ए. पठाण, डॉ. मोहन जोशी, डॉ. राजाळे, प्रा. सिध्दार्थ मुंगे, श्रीनिवास मुंडे, डॉ. निकाळजे, डॉ. रामदास निहाल, डॉ. सुशील लांडे, डॉ. डी. डी. खामकर आदींची उपस्थिती होती. या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये राज्यभरातील अनेक प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांनी नोटाबंदी व वस्तु व सेवा करावर आपले शोधप्रबंध सादर केले.

Unlimited Reseller Hosting