Home महत्वाची बातमी जर तुमचे स्टेट बँकेत अकाउंट असेल तर पटकन हे काम करून घ्या...

जर तुमचे स्टेट बँकेत अकाउंट असेल तर पटकन हे काम करून घ्या अन्यथा दहा दिवसा नंतर तुमचे पैसे निघणार नाहीत , ???

154

अमीन शाह

देशातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेच भारतीय स्टेट बँकेत (SBI) जर तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. जर तुम्ही अद्याप आपले केवायसी (KYC) पूर्ण केले नसेल तर तुम्हाला तुमच्या खात्यावर व्यवहार करता येणार नाही. आता तुमच्याकडे फक्त १० दिवस शिल्लक राहिले आहेत. यानंतर तुमचे बँक खाते बंद केले जाऊ शकते. वास्तविक, एसबीआयने केवायसी पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत निश्चित केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व बँक खात्यांसाठी केवायसी (Know Your Customer) अनिवार्य केले आहे. केवायसी म्हणजे ग्राहकाबद्दल संपूर्ण माहिती होय. प्रत्येकासाठी केवायसी मिळवणे हे महत्वाचे असते. एक प्रकारे केवायसी हे बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंध मजबूत करते. केवायसी शिवाय गुंतवणूक करणे शक्य नाही, तसेच बँक खाते उघडणे देखील सोपे नाही.
२८ फेब्रुवारीपर्यंत निपटून घ्या ही कामे
एसबीआयने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे की २ फेब्रुवारी २०२० पर्यंत केवायसी पूर्ण करावे. जर एखादा ग्राहक केवायसी करत नसेल तर त्याच्या बँक खात्याचा व्यवहार थांबविला जाणार आहे. एसबीआयने म्हटले आहे की कृपया आपल्या केवायसीच्या नवीनतम कागदपत्रांसह एसबीआय शाखेशी संपर्क साधा. केवायसी पूर्ण न झाल्यास आपल्या खात्यातील भविष्यातील व्यवहार थांबविले जाऊ शकतात. असे देखील बँकेने सांगितले आहे.
केवायसी म्हणजे काय ?
केवायसी म्हणजे Know Your Customer म्हणजेच आपल्या ग्राहकांना जाणून घ्या . केवायसी ही आरबीआयद्वारा आयोजित केलेली एक ओळख प्रक्रिया आहे, ज्याच्या सहाय्याने बँका आणि अन्य वित्तीय संस्था आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतात. बँका आणि वित्तीय कंपन्या यासाठी फॉर्म भरुन ठेवतात आणि त्याबरोबर काही प्रमाणात ओळखीचा पुरावा देखील घेतात.
ओळखपत्रांसाठी आवश्यक कागदपत्र
SBI च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार केवायसीसाठी ग्राहकाला त्यांचे ओळखपत्र द्यावे लागते. ओळखपत्रात पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, नरेगा कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर, टपाल कार्यालयाद्वारे देण्यात आलेले ओळखपत्र, सार्वजनिक प्राधिकरण संस्थांनी दिलेली ओळखपत्र जे आपल्याद्वारे जारी केलेल्या ओळखपत्रांच्या नोंदी ठेवतात.
निवासी प्रमाणपत्र
निवासी प्रमाणपत्र देखील द्यावे लागणार आहे. ज्यामध्ये टेलिफोन बिल (३ महिन्यांपेक्षा जुने नसावे), बँक खात्याचे स्टेटमेंट (३ महिन्यांपेक्षा जुने नसावे), मान्यताप्राप्त सरकारी प्राधिकरणाद्वारे जारी केलेले पत्र, विजेचे बिल (६ महिन्यांपेक्षा जुने नसावे), रेशन कार्ड, विश्वसनीय नियोक्तांनी दिलेली ओळखपत्र, आयकर/मालमत्ता कर निर्धारण आदेश, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (३ महिन्यांपेक्षा जुने नसावे), नोंदणीकृत रजा व परवाना करार/विक्री करार/लीज कराराच्या प्रति, विद्यापीठाच्या/संस्थेच्या वसतिगृहाच्या वॉर्डनने जारी केलेल्या प्रवेशाच्या प्रती, ज्यावर कुलसचिव, प्राचार्य/डीन – विद्यार्थी कल्याणद्वारे स्वाक्षरी केलेली असावी. विद्यार्थ्यांच्या बाबतीत, जर ते आपल्या नातलगांकडे राहत असतील तर त्यांचे ओळखपत्र आणि त्यांचे रहिवासी प्रमाणपत्र असणे बंधनकारक असणार आहे.