Home मराठवाडा आंतरराज्य वाहन चोरांच्या टोळीच्या मुसक्या ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या

आंतरराज्य वाहन चोरांच्या टोळीच्या मुसक्या ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या

21
0

ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई
३५ लाख ४९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

अब्दुल कय्युम

औरंंगाबाद , दि. १७ :- ग्रामीण भागातून चोरी केलेल्या ट्रकची बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने परराज्यात विक्री करणारया आंतरराज्य टोळीच्या मुसक्या ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या. अटकेत असलेल्या सहा जणांकडून पोलिसांनी एक हायवा ट्रक, तीन कार, मोबाईल, रोख रक्कम असा एकुन ३५ लाख ४९ हजार रूपये कीमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सोमवारी (दि.१७) पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी अशोक लहीरे (रा.वांजरगाव, ता.वैजापूर), पिंटु उफ महेश भगवान बिरूटे उर्प कहार (रा.अमरधाम, नाशिक), अब्दुल कलाम महंमद इस्लाम चौधरी (वय ४०, रा.उडसाई, ता.महेदेगाव, जि.संत कबीर, उत्तरप्रदेश,ह.मु. संग्रामपुर, सुरत, गुजरात), दिवांकर र्छोटु एकनाथ चव्हाण (वय २२, रा.किसनगंज, दिल्ली,ह.मु.कवास, सुरत), शुबनेसकुमार दिनेशकुमार भाटीया (वय २६, रा.मनेथू,ता.पुलपूर, जि.इलाहाबाद, उत्तरप्रदेश,ह.मु. कवास, सुरत), मोहंमद इस्तीखान मो सफारखान (वय ३०, रा.भेंडवाह, कारजा,ता.बासी,जि.सिध्दार्थनगर,उत्तरप्रदेश,ह.मु. इच्छापुर, सुरत) अशी अटक केलेल्या वाहन चोरट्यांची नावे आहेत.
ग्रामीण पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधिक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत पुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, भगतसिंह दुलत, जमादार विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, श्रीमंत भालेराव, सुनिल खरात, राजेंद्र जोशी, किरण गोरे, रमेश अपसनवाड, वाल्मिक निकम, योगेश तरमळे,ज्ञानेश्वर मेटे,रामेश्वर धापसे,गणेश गांगवे,जीवन घोलप, संजय तांदळे आदींच्या पथकाने

वाहन चोरट्यांच्या मुसक्या
आवळल्या.

चोरीचा ट्रक विकला परराज्यात
समृध्दी महामार्गाचे काम सुरू असलेल्या वैजापूर तालुक्यातील डव्हाळा गावातून अटकेतील चोरट्यांनी ८ ते ११ जानेवारीच्या दरम्यान एक हायवा ट्रक चोरून नेला होता. याप्रकरणी संतोष सुखदेव बोरूडे (वय ४२,रा.डव्हाळा,ता.वैजापूर) यांच्या तक्रारीवरून वैजापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल होता. डव्हाळा येथून चोरलेला हायवा ट्रक या टोळीने गुजरातमध्ये नेवून विक्री केला होता. या टोळीने चोरीचे ट्रक उत्तरप्रदेश, गुजरात,मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात विक्री केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .