Home विदर्भ दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद….!!

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद….!!

25
0

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व अवधुतवाडी पोलीसांची कार्यवाही….!!

रवि माळवी

यवतमाळ , दि. १७ :- शहरातील जाजु चौक ते दत्त चौक कडे जाणार्या रोडवरील नगर परिषदेचे कॉम्प्लेक्स जवळील असलेल्या दुकानाचे शेटर तोडत असतांना सहा दरोडेखोर आरोपींना पोलीसांनी अटक केली. आरोपी हे एका आटोरिक्षामध्ये आले होते. पोलीसांनी ही कार्यवाही दिनांक १६ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास केली.
नदि बेग नसीम बेग, मोहम्मद अनवर मोहम्मद शमिम, एजाज भग्गू मिरावाले, राजा मधुकर तांडेकर, परवेजखान एहसान उल्लाह खान, आकाश सुभाष शिंदे सर्व रा.मोतीनगर व चांदनगर दिग्रस असे पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सौ.(प्र.) नूरुल हसन सो.,यवतमाळ उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक, श्रीमती माधुरी बावीस्कर मॅडम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर सो.यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली यवतमाळ शहरातील दरोडा, चोरी, घरफोडी ईत्यादी घटनांना प्रतिबंध व्हावा या हेतुने, दैनंदिन आढावा घेवून पोलीस अधीक्षकांनी या करीता पुढाकार घवेून स्वत: उपाययोजना सुचविल्या होत्या. या करीता प्रभावी पेट्रोलींग करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी व कर्मचारी तसेच यवतमाळ शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सुचना दिलेल्या होत्या.
दिनांक १६ फेब्रुवारी रोजी यवतमाळ शहरातील जाजु चौक ते दत्त चौका कडे जाणारे रोडवरील नगर परिषदेचे कॉम्प्लेक्स जवळील एका भाजी विक्रेता या नामफलकाजवळ एक नांदेड पासींग असलेली अॅटो रिक्षा क्रमांक एम.एच.२६ एन.११८७ ही संशयास्पदरित्त्या उभी असलेली दिसली. पेट्रोलींग कामी तैनात असलेल्या पथकांनी याबाबत शोध घेतला असता तेथील कॉम्प्लेक्स मधील एका गाळ्याचे शटर तोडतांना ६ ईसम दिसले पोलीसांनी सावधगीरीने त्यांना रंगेहाथ पकडून त्यांचेकडे अॅटो रिक्षा, मोटार सायकल व दरोडा टाकण्याचे साहित्य, कटावणी, लोखंडीगज, चाकू, मिरची पुड इत्यादी साहित्य किंमत ४३ हजार ४२० रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने ते पंचासमक्ष जप्त करुन अवधुतवाडी पोलीस स्टेशन येथे त्यांचे विरुध्द भादंवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे दरोडा टाकण्याचे उद्देशाने एकत्र येवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे या अपराधान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या आरोपी ईसमांवर चोरी, मारामारी, रात्री अपरात्री संशयास्पद फिरणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे विविध पोलीस स्टेशनला दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांचे तक्रारी वरुन अवधुतवाडी पोलीस स्टेशनला अपराध दाखल झालेला आहे. अपराधाचा पुढील तपास अवधुतवाडी पोलीस स्टेशनचे प्र.सहा.पोलीस निरीक्षक अजय आकरे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, बंडु डांगे, योगेश गटलेवार, विनोद राठोड, हरिष राऊत, विशाल भगत, गजानंद हरणे, मो.जुनेद, सुरेंद्र वाकोडे, व अवधुतवाडीचे पेट्रोलींग वरील अधिकारी, कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय आकरे, पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे, मेढे, सलमान, पुसदकर यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.

Unlimited Reseller Hosting