Home मुंबई आनंदश्री संस्था, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रा. सचिन...

आनंदश्री संस्था, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रा. सचिन वाडेकर याना पुरस्कार प्रदान

216

मुबंई , दि १६ :- दिनांक 15 फेब्रुवारी 2020 शनिवारी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आनंदश्री संस्था यांच्या वतीने Excellent Ledership Awards ने 6 राज्यातील एकूण ५० जणांना गौरवण्यात आले. प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा प्रा.दिनेश गुप्ता यांनी याचे आयोजन केलेले होते.या मध्ये पुण्यातील झील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मध्ये व्यवस्थापन विभागात गेल्या 5 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व विविध सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या प्रा.सचिन वाडेकर यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यबद्दल आनंदश्री संस्थेच्या पदाधिकाऱ्यां तर्फे सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.प्रा.सचिन वाडेकर यांचे झील एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी संचालक श्री.प्रदीप खांडवे यांनी अभिनंदन केले तर संस्थेचे सचिव जयेश काटकर यांनी शुभेच्छा दिल्या.