Home बुलडाणा महाबीज च्या केंद्र अभियंत्यास शेतकर्याच्या फसवणुक प्रकरणी घेराव…

महाबीज च्या केंद्र अभियंत्यास शेतकर्याच्या फसवणुक प्रकरणी घेराव…

73
0

फसवणुक झाल्याचे सि सि टिव्ही व्दारे उघड

पि के व्ही चे कार्यकारी परीषद सदस्य विनायक सरनाईक यांनी विचारला जाब…

प्रा. तनज़ीम हुसैनबुलढाणा , दि. १६ :- चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील शेतकर्याने महामंडळाचे सोयाबीन बियाने घेतले होते.शेतकर्याची चाळणी करीत असतांना त्यांच्या दोन बँगा दुसर्याच लाँट मध्ये घातल्याचे सि सि टि व्हि फुटेजव्दारे उघड होऊन व यासंदर्भाने शेतकर्याने तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने आज दि१५फेब्रुवारी रोजी रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पंदेकृवि अकोलाचे सदस्य विनायक सरनाईक स्वाभिमानीचे नितिन राजपुत यांनी केंद्र अभियंता यांना घेराव घालुन सदर प्रकरणी जाब विचारण्यात आला व फसवणुक प्रकरणी संबंधीत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चिखली येथील बिज प्रक्रीया केंद्रावर सोनेवाडी येथील शेतकरी सुधाकर तायडे यांचे दि२४जानेवारी २०१९रोजी रात्री ११वाजे सुमारास सोयाबीन चाळणी करण्यात आली. शेतकरी स्वत:हजर असताना.चाळणी झाल्यानंतर शेतकर्याला देण्यात आलेल्या मालात व मोजमापात तफावत दिसुन आल्याने शेतकर्याने संबंधीत शिफ्ट इंचार्ज यांबाबद विचारणा केली;मात्र त्यांनी शेतकर्यास सहकार्य न करता उडवाउडवीचे उत्तरे दिले.तर शेतकर्याचे १४६बँगा असल्याचा कच्चा हिशोब शेतकर्यास देण्यात आला;मात्र माल मोजमापात ताफावत दिसुन आल्याने शेतकर्याने हिशोब रेकाँर्डवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्या नंतर दुसर्या दिवशी पक्का हिशोब १४७चा दाखवण्यात आला होता.याबाबतची माहिती शेतकर्यान २५जानेवारी रोजी शेतकर्याने याबाबतची माहिती विनायक सरनाईक,नितिन राजपुत यांना दिली असता, सिसिटिव्हि फुटेज तपासण्यात आले.यामध्ये ६२७लाँट नंबरच्या दोन बँगा दुसर्याच लाँटमध्ये घातल्या गेल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकर्याच्या दोन पेक्षा अधिक बँगा ओढल्याची चौकशी करून फसवणुक झाल्या प्रकरणी पंचनामा करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकर्याने केली होती;मात्र याबाबद या गंभीर बाबी संदर्भाने पंधरा ते विस दिवस उलटुन हि कारवाई न झाल्याने दि१५फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य बियाने महामंडळाचे बिप्रके महाबीज अभियंता श्री अनोकार यांना रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परीषद सदस्य विनायक सरनाईक,स्वाभिमानीचे नितिन राजपुत यांनी शेतकर्याची फसवणुक झाल्याचे उघड झाल्याने सदर प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.तर प्रकरणा संदर्भातील कागदपत्रे देण्यात येत नसल्याने महाबीज कडुन फसवणुक करणार्याना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप शेतकरी सुधाकर तायडे यांनी केला आहे. यावेळी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Unlimited Reseller Hosting