नांदेड , दि. १६ :- आज केंद्र व राज्य शासनाच्या अनेक आरोग्य योजना असून त्या योजनांची माहिती बर्याच अंशी सामान्य,मध्यमवर्गीय व गोर गरीब,गरजू लोकांपर्यंत पोहचत नसताना देखील या दोन्ही संस्थांनी नि:शुल्क व मोफत अश्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहे हे स्तुत्य उपक्रम असल्याचे मत आ.मोहन अण्णा हंबर्डे यांनी व्यक्त केले.
◼ एकजुट बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व अल ईम्रान प्रतिष्ठाण नांदेडच्या वतीने प्रधानमंञी जन आरोग्य योजना,महात्मा फुले आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन मौलाना आझाद नगर नई आबादी येथे घेण्यात आला.कार्यक्रमास उदघाटक म्हणून आ.मोहन अण्णा हंबर्डे तर प्रमुख म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड़, महापौर प्रतिनिधी विलास धबाले,उपमहापौर सतीष देशमुख, नगरसेविका सलीमा बेगम,नगरसेवक दुष्यंत सोनाळे,उमेश चव्हाण,अलीम खान,नगरसेवक प्रतिनीधी विजय येवनकर,फेरोज खान,पी.एम.योजनेचे जिल्हा समन्वयक डाॕ.दिपेशकुमार शर्मा,लोहा जि.प.सदस्य कैलास भाउ,पोलीस निरिक्षक नरवटे आदिंची उपस्थिती होती.कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांच संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.आ.हंबर्डे पुढे म्हणाले कि आज जिल्हयाचे पालकमंञी ना.अशोकरावजी चव्हाण हे आहेत त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे रहायच तसेच असे कार्यक्रम घेण्याची आज गरज असून या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या दोन्ही संस्थेच त्यांनी कौतुक केले. .यावेळी जवळपास दोनशे लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड चे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल ईम्रान प्रतीष्ठाणचे सचिव ईम्रान खान पठाण यांनी केले तर सुञसंचलन शेख अनवर यांनी तर आभार फिरोज़ खान मा.नगरसेवक यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शोएब खान,मोहम्मद नदीम,लायख अली,मोहम्मद नईम,मोईन काजी आदिंनी परिश्रम घेतले.