Home रायगड कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन मटक्याच्या धंद्यांवर पोलिसांची धडक कारवाई

कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन मटक्याच्या धंद्यांवर पोलिसांची धडक कारवाई

177

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

कर्जत , दि. १६ :- कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पश्चिम भागात क्रांती नगरपरिसरात चोरुन मटक्याचा धंदा सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली, तीन मटका धंदा करणाऱ्या बाहदूरांवर पोलिसांनी दि.14 फेब्रुवारी रोजी धडक कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर केले आहे.
कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजे क्रांती नगर मधील झोपडपट्टी येथे गैरकायदा विनापरवाना कल्याण नावाचा मटका फिरस्ता पद्धतीने घेत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार कर्जत पोलिसांनी धडक कारवाई करून संदीप बाळकृष्ण गुरव रा. पाटील आळी याला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले, त्यावेळी त्याच्याजवळ 245 रुपयाचा ऐवज जप्त केला.

मौजे क्रांतीनगर झोपडपट्टी येथील गैरफायदा विनापरवाना बेकायदेशीर रित्या मटका जुगाराची साधने उपलब्ध करून मटक्याची रक्कम फ्लेक्सवर ग्राहकांनाद्वारे लावून मटका घेत असताना खोपोली शिळफाटा यशवंत नगर येथील शिनाकौर जिल्लूसिंग दुधानी हिला 610 रुपयाच्या ऐवजा सह ताब्यात घेण्यात आले.
तसेच क्रांतीनगर कर्जत येथील मौजे जय मल्हार इंटरप्राईजेस नावाच्या दुकानासमोर गैरकायदा, विनापरवाना बेकायदेशीररित्या मटका जुगाराची साधने उपलब्ध करून मटक्याची रक्कम फ्लेक्सवर गि-हाकाद्वारे लावून मटका घेत असताना खंडू बाबुराव हातागळे रा. क्रांतीनगर आढळून आला, त्याच्या 530 रुपयाच्या ऐवज आढळून आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव पाटील, प्रशांत देशमुख आदी कर्मचा-यांनी धाड टाकून धडक कारवाई केली, यामध्ये संदीप गुरव आणि शिनाकौर जिल्लूसिंग दुधानी यांना काल दि.15 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकाला 1 हजार रुपये दंड व कोर्ट उठे पर्यत शिक्षा सुनावली आहे.