बुलडाणा

लोणार ते किन्ही रोडवर बोलेरो जिपचे टायर फुटल्याने जिप पलटी झाल्याने एक ठार तिन गंभीर

Advertisements

सचिन गोलेचछा – लोणारबुलडाणा , दि. १६ :- लोणार तालुक्यातील किन्ही गावाजवळ असलेल्या वळणावर बोलेरो जिपचे टायर फुटल्याने जिपवरील चालकाचा ताबा न राहील्याने जिप समोरून येणाऱ्या आयशरला धडकल्याने जिप पलटी झाली यामध्ये एक महीला ठार तर तिन जन गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान घडली याबाबत लोणार पोलीसानी बुलेरो चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.रिसोड तालुक्यातील आसेगाव येथील 9 जण औरगांबाद येथे रूग्नालयात भरती असलेल्या नातेवाईकाना भेटण्यासाठी सकाळी 7.30 वाजता आसेगावरून बोलेरो जिप क्रं. एम एच 37 एस 7211 ने जात असताना लोणार ते किनगाव जटटु रोडवर किेन्ही गावाजवळ जिपचे मागील टायर फुटल्याने जिपवरील चालकाचा ताबा राहीला नाही त्यामुळे सदर जिप किनगावजटु कडुन येणाऱ्या पलसिध्द कंपनीचे आयसर क्रं.एम एच 28ए बी 7082 वर डिझेल टाकीवर आदळल्याने जिप पलटी झाली यामध्ये शंकुतला पांडुरंग शिंदे वय 55 रा. पागरखेडा ता. रिसोड जि. वाशिम ही महीला जागीच ठार झाली असुन यामध्ये संगीता संतोष इंगोले, बडु पिराजी खानझोडे पुरनाबाई श्रीराम शिंदे हया गंभीर जखमी झाल्या असुन जखमीना ग्रामीण रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत लोणार पोलीसात बडु पिराजी खानझोडे यांनी बोलेरो चालक गोपाल मंगल वानखेडे याच्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे या घटनेची माहीती पोलीसाना मिळताच पोलीस उपनिरीक्षक उंकडराव राठोड, राम गिते घटनास्थळी दाखल झाले होते पुढील तपास लोणार पोलीस करीत आहे.

You may also like

बुलडाणा

रुग्णांचा खाजगी कोव्हिड सेंटर व शासकीय कोव्हिडं सेंटर बद्दल असलेला संभ्रम दूर करा

  *रुग्णांचा हेडगेवार कोव्हिड सेंटर व अनुराधा कोव्हिड सेंटर बद्दल असलेला संभ्रम दूर करा* प्रशांत ...