Home विदर्भ ग्रेडर मशीन डोक्यावरून गेल्याने सायकलस्वार ठार .!

ग्रेडर मशीन डोक्यावरून गेल्याने सायकलस्वार ठार .!

187

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १६ :- जिल्ह्यातील हिंगणी- बोरधरण मार्गावर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण चे काम सुरु असल्याने जाण्यासाठी अरुंद मार्ग असल्याने कामावरील सुरु लेव्हलर मशीन मधे जाऊन सायकल स्वार पडल्याने त्याचा जागीच म्रुत्यू झाला. म्रुतकाचे नाव भोजराज शंकर बुलकुंडे वय 55 असून तो नजिकच्या बोरी (कोकाटे) येथील रहिवासी आहे. सदर घटना ही शनिवारी दुपारी १ वाजताचे सुमारास हिंगणी येथील सुधाकर मुडे यांचे घरा सामोर घडली.
शेतकरी भोजराज हा हिंगणी येथून काम आटोपून स्वगृही बोरधरण नजिकच्या बोरी कोकाटे येथे सायकल ने जात होता.या रस्त्याचे काम सुरु असल्याने गिट्टीचा थर पसरविण्यात आला असून खडबडपणा आहे. केसीसी कंपनीच्या लेव्हलर मशीन ने गिट्टी दबाईसह सपाटीकरण चे काम सुरु होते. सायकल स्वार त्या मशीन चे काठानेच जात असता खडबडीत रस्त्यामुळे सायकलचे संतुलन बिघडले व तो सरळ मशीनखाली गेला. सुरु असलेली मशीन त्याचे अंगावरुन गेल्याने त्याचा घटनास्थळी म्रुत्यू झाला. सायकल स्वार मद्यप्राशन करुन असल्याने त्याचा सायकल वरुन ताबा सुटल्याचेही काही लोकांनी सांगितले.सेलु पोलिसात घटनेची नोंद झाली असून पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे यांचे मार्गदर्शनाखाली बीट जमादार ज्ञानेश्वर खैरकार,नारायण वरठी व गजानन वाट करीत असून प्रेत उत्तरीय तपासणी साठी सेलु ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.