मराठवाडा

विहिरीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह सर्वत्र खळबळ

Advertisements

वेरूळ शिवारातील घटना, खुलताबाद पाेलिस ठाण्यात गुन्हा…!!

संदीप अवघड

औरंगाबाद , दि. १६ :- तालुक्यातील वेरूळ शिवारातील असलेल्या विहिरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला असून तालुक्यातील वेरूळ, माटेगाव, कसाबखेडा परिसरात खळबळ उडाली आहे. सदरील महिलेची आत्महत्या की हत्या पोलिस पुढील तपास करीत असून या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ शिवारात ओमप्रकाश साबरमल चाबू यांच्या शेतातील विहिरीत दोन ते तीन परस पाणी आहे. चाबू यांच्या शेताशेजारील शेतकरी दररोजप्रमाणे विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेला होता. दरम्यान शेतकऱ्याला विहिरीतून दुर्गंधी येऊ लागली. शेतकऱ्याने विहिरीत डोकावून पाहिले असता एका अज्ञात महिलेचा मृतदेह विहिरीत तरंगत असलेला दिसला. शेतकऱ्याने सदरील माहिती खुलताबाद पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक भगवान झरेकर, नीळकंठ देवरे, सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सरपंच नईम पटेल, पोलिस पाटील संतोष सातदिवे, तन्वीर पटेल व इतरांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. सदरील महिलेचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत व सडलेला असल्याने मृत महिलेची ओळख होत नव्हती. मृत महिलेचे अंदाजी वय ३० असून अंगात भुरकट साडी घातलेली होती.
पोलिस पाटील संतोष सातदिवे, तन्वीर पटेल व इतरांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. सदरील महिलेचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत व सडलेला असल्याने मृत महिलेची ओळख होत नव्हती. मृत महिलेचे अंदाजी वय ३० असून अंगात भुरकट साडी घातलेली होती.

You may also like

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...
मराठवाडा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना – मागील पंधरवड्यात तालुक्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील ...