Home महत्वाची बातमी आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची संधी

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची संधी

27
0

अमीन शाह

देशातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता नागरिकांना येत्या ३१ मार्चपर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करणे बंधनकारक आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. हि मुदत वाढविण्यात आल्यानंतर २७ जानेवारी २०२० पर्यंत तब्बल ३० कोटी ७५ लाख नागरिकांनी आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले आहे. मात्र, अद्याप १७ कोटी ८५ लाख नागरिकांनी अजूनही आपले पॅन कार्ड आधारकार्डसोबत लिंक केलेले नाही. त्यामुळे, त्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी येणे शक्य आहे.

तुमचे पॅन कार्ड ‘आधार’सोबत लिंक करण्याची प्रक्रिया काय ?

आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी आयकर विभागाची ई-फायलिंग वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in वर जाऊन वेबसाईटवरील ‘लिंक आधार’ हा पर्याय निवडा. रजिस्ट्रेशन करून वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर ‘प्रोफाईल सेटिंग’मध्ये जाऊन ‘लिंक आधार कार्ड’चा पर्याय निवडा. त्यानंतर तिथे तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि कोड टाका. ही माहिती भरल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारही लिंक होईल. त्याचप्रमाणे, ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर एसएमएस करुन देखील तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.

Unlimited Reseller Hosting