Home मराठवाडा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वृद्धी व्हावी या साठी शिष्यवृत्ती...

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वृद्धी व्हावी या साठी शिष्यवृत्ती परीक्षा

35
0

सययद नजाकत – बदनापूरजालना , दि. १६ :- प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वृद्धी व्हावी व त्यांना चालना मिळावी या उद्देशाने दरवर्षी प्राथमिक संचालनालय मार्फत शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते त्यानुसार यंदा देखील परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले असून तालुक्यातील दोन हजार दोनशे चौष्ठ विदयार्थ्यांनि 21 केंद्रावर परीक्षा दिली . बदनापूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सूर्यकांत कडेलवार यांच्या नियंत्रणाखाली शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर,केंद्र प्रमुख विलास राजगिरे ,प्रभाकर ढाकणे यांनी तालुक्यातील बदनापूर,सेलगाव,गेवराई बाजार,दाभाडी,केलींगव्हान,चिखली,काजळा,बाजार वाहेगाव,बावणे पांगरी , भाकरवाडी , सोमठाणा या गावातील 21 ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र देण्यात आले या मध्ये इयत्ता पाचवी चे 1227 व इयत्ता आठवीचे 1037 असे 2264 विदयार्थ्यांनी परीक्षा दिली . बदनापूर तालुका मागील वार्षि देखील शिष्वुती परीक्षेत जिल्ह्यत प्रथम ठरला होता त्यामुळे दरवर्षी या परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यर्थ्यांची संख्या वाढत आहे .

Unlimited Reseller Hosting