Home जळगाव जळगाव तहसील कार्यालयात लागली आग…

जळगाव तहसील कार्यालयात लागली आग…

140

आगीत महत्वाचे दस्तऐवज जळून खाक

आग लागली की लावली गेली ?रावेर (शरीफ शेख)जळगाव , दि. ११ :- शहरात मध्यवर्ती बळीराम पेठेतील तहसील कार्यालयास रात्री आग लागल्याची घटना घडली. कार्यालयातील मागील बाजुस निवडणूक आणि पुरवठा विभागाच्या रेकॉर्डरुमला लागलेल्या आगीत महत्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, शॉटसर्कीट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज यांनी व्यक्त केला आहे.भागातील हेरिटेज दर्जा प्राप्त तहसील कार्यालयाच्या इमारतीत मागील बाजुस निवडणुक आणि पुरवठा शाखेत रात्री 11 वाजेपुर्वी भिषण आग लागली. आगीचे लोट आकाशात उठू लागल्यावर जिल्हापरीषद कार्यालयातील वॉचमनद्वारे पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कळवण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसींग रावळ यांनी कळवल्यानंतर तहसीलदार वैशाली हिंगे, प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण केले होते. दोन अग्नि बंबाच्या साहाय्याने पाऊण तासात आगिवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळाले.
विद्युत तारांचे जाळे
तहसील कार्यालयाच्या दगडी बांधकामातील इमारतीत सर्वदुर डोक्‍यावर विद्युत तारांचे जाळे पसरलेले असून आग लागली त्या खोल्यांच्या बाहेरही तशीच परिस्थीती असून या तारांमध्ये शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह्
तहसील कार्यालातील तारांच्या भेंडोळ्यासाठी वारंवार एमएसईबीला कळवण्यात आल्याचेही येथील कर्मचाऱ्यांनी माहिती देतांना सांगीतले.