Home मराठवाडा डाक विभागाची टीम पोहचली शेताच्या आखाड्यावर

डाक विभागाची टीम पोहचली शेताच्या आखाड्यावर

128

ग्राउंड रिपोर्ट मार्केटिंग एक्सिकेटीव्ह नांदेड

धर्माबाद , दि.१० रोजी गांगलेगाव येथील शाखा डाकपाल श्री. पिलेवाड यांनी शेतमजूर व गोरगरीब नागरिकांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा लाभ देण्यासाठी हळदीच्या शेता मध्ये आखाड्या वरील राहणाऱ्या शेतकऱ्यांना पोस्ट बँकेचे खाते उघडून दिले.
नांदेड डाक टीम मा. डाक अधीक्षक श्री.शिवशंकर बी लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील व वाड्या तांड्यात या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा लाभ प्रत्येकांना मिळावा या योजनेपासून कोणीही वंचीत राहू नये म्हणून नांदेड जिल्ह्यात ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.
ही या मोहिमेवर मा. डाक निरीक्षक देगलूर श्री. सिंधू नानिर यांनी लक्ष ठवले असून देगलूर विभागातील ग्रामीण भागात व वाड्या तांड्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी दररोज कोणत्या गावात किती पोस्ट बँकेचे खाते उघडले आहे याची घेत आहेत.
या पोस्ट बँकेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे अहवान डाक अधीक्षक नांदेड यांनी केले आहे.