शरीफ शेख
जळगाव , दि. १० :- संविधान बचाव नागरी कृती समिती महिला शाखा जळगाव शहर च्या माध्यमाने जळगाव शहरात वेगवेगळ्या या परिसरामध्ये एक शाम शाहीन बाग के नाम या मथळ्याखाली मुस्लिम व हिंदू महिला एकत्रित येऊन रात्री ७ ते १० वाजेपर्यंत दिल्ली येथील शाहीन बाग मध्ये बसलेल्या महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी जळगाव शहरात परिसर वाईज बसत असून रविवार हा शाहूनगर येथील परिसरातील महिलांनी एकत्रित बसून ही रात्र साजरी केली.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा शिंदे, नगरसेविका मंगलाताई कदम, माजी नगरसेविका अश्विनी देशमुख ,राष्ट्रवादी पार्टीच्या सौ मंगला पाटील, काजल पाटील, स्वाती पाटील ,यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक महिलांचा यात यात समावेश होता इकरा कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर फिरदोस सिद्दिकी, बीयूएमएस च्या डॉक्टर सुमय्या सालार यांनी या कार्यक्रमाचे नेतृत्व केले शाहूनगर मधील अरबी मदरसा मधील विद्यार्थिनी तसेच शिक्षकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता सर्व महिलांनी आपापले विचार विशद केले.
सदर महिलांचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाहूनगर येथील फिरोज शेख महमूद सर एजाज शेख मास्तर दिस्ती इमरान शेख रईस शेख विक्रम शेख रईस बागवान याकूब बांगी मुस्ताक शेख इमाम अहमद खान नूर मोहम्मद खान फारुक सय्यद अमीर सय्यद यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला गफ्फार मलिक, करीम सालार, फारुक शेख, फिरोज मुलतानी, रिजवान जागीरदार, अलफैज़ पटेल, फारूक अहेलेकार नजीर मुलतानी, आयाज अली, अन्वर सिकलिगर, आदींची विशेष उपस्थिती होती.