Home महत्वाची बातमी भारतातील लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ वृत्तपत्र टायटल नोंदणी कार्यालयातून ऐतिहासिक व धक्कादायक बातमी

भारतातील लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ वृत्तपत्र टायटल नोंदणी कार्यालयातून ऐतिहासिक व धक्कादायक बातमी

200

RNI कडून 1 लाख 44 हजार 893 वृत्तपत्रांना दंडाची नोटीस…

एकट्या नांदेड जिल्ह्यातील 143 वृत्तपत्रांना वार्षीक विवरण न भरल्यामुळे नोटिस

नांदेड , दि. १० :& ( राजेश भांगे ) दि. 29 फेब्रुवारीपर्यत दंड न भरल्यास कारवाई
वृत्तपत्राचे रजिस्ट्रेशन नोंदणीची नवी दिल्ली येथील रजिस्ट्रॉर ऑफ न्युजपेपर्स फॉर इंडिया (आर.एन.आय.) यांच्याकडून मागील काही वर्षाचे वार्षिक विवरण (ऑडीट) न भरल्याचे कारण देत भारतातील लहानमोठ्या एकूण 1 लाख 44 हजार 893 वृत्तपत्रांवर दंड (पेनल्टी) लावली आहे. याबाबतची सामुहिक नोटीस या कार्यालयाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आली असून येत्या 29 फेब्रुवारीपर्यत मागील वार्षिक विवरण किंवा दंड न भरल्यास प्रेस व पुस्तक पंजीयन अधिनियम 1867 (पी.आर.बी. अ‍ॅक्ट) च्या कलम 19 नुसार कारवाई करण्याच्या सुचना या नोटीसमध्ये देण्यात आल्या आहेत.