मुक्ताईनगर येथील मुस्लिम समाजा तर्फे तहसीलदार साहेबाना निवेदनाद्वारे मागणी…
रावेर (शरीफ शेख)
जळगाव , दि. ०३ :- जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील मुस्लिम समाजा तर्फे तहसीलदार साहेबाना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की,वर्ध्या जिल्हयातील हिंगणघाट शहरातील सोमवारी नंदोरी चौक परिसरात महाविद्यालयात पायदळ जात असलेल्या प्राध्यापिका अंकिता या युवती चे अंगावर आरोपी विकेश(विक्कि)नगराळे यानी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला,यात युवती ची प्रकृती चिंताजनक असून,हे घटना अत्यंत दुर्दैवी व मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे,तरी आम्ही आज समस्त मुस्लिम समाज मुक्ताईनगर या घटनेचा तिव्र निषेध करतो व या निवेदनाद्वारे मागणी करतो की संबधित नराधमांला मृत्युदंड ची शिक्षा द्यावी,या वेळी जळगाव मनियार बिरादरी चे जिल्हा उपअध्यक्ष हकीम चौधरी,रामरहीम रिअल इस्टेट चे किशोर किसन पाटील,मुख्तार खान,शेख असगर शेख अकबर,उर्दू पत्रकार रिजवान चौधरी,शेख आसिफ शेख उस्मान,शेख वसीम कुरेशी,दतू सोनार,बाळू भगवान पाटील,सादिक खटीक,हुसेन शाह कलंदर शाह,हसन शाह कलंदर शाह,आदि समाज बांधव उपस्थित होते.