Home विदर्भ अखेर त्या बिबट्याची झाली सुटका , “सरोवरात सोडले”

अखेर त्या बिबट्याची झाली सुटका , “सरोवरात सोडले”

15
0

अमीन शाह

बुलठाणा , दि. ०६ : :- लोणार सरोवरानजीक किन्ही रोडवर एका शेतात तार कंपाउंड असलेल्या जाळीत बिबट्या अडकलेला नागरिकांना आढळून आला ही घटना 6 जानेवारी रोजी सकाळ च्या सुमारास घडली लोणार सरोवर किन्ही रोड वर दत्ता खरात या शेतकऱ्याचे शेत आहे.
त्यांनी जनावराच्या त्रास होवू नये या करिता शेताला तार कंपाउंड केले आहे रात्री च्या सुमारास बिबट्या सरोवर परिसरात फिरत असताना खरात यांच्या शेताच्या तार कंपाउंड जाळी मधे अडकला ही घटना खरात यांना सकाळी 7 वाजता दिसून आली त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती पोलीस व वन विभागाला दिली माहिती मिळताच् वन विभागाचे सानप , वनपाल पवार यांच्या सह वन कर्मचारी व पोलीस घटना स्थळी पोहचले या वेळी रेस्क्यु व्हॅन ला पचारण करण्यात आले तर बिबट्या शेताच्या तार कंपाउंड जाळीत अडकल्याची माहिती मिळताच नागरिकांनी बिबट्या ला बघण्याची एकच गर्दी केली होती आणखी 3 बिबटे असल्याची चर्चा यावेळी शेतकरी व नागरिकामधे चर्चा सुरु होती.

Unlimited Reseller Hosting