Home मराठवाडा पती पत्नी च्या वादात चिमुकला झाला पोरका

पती पत्नी च्या वादात चिमुकला झाला पोरका

251

अमीन शाह

लातूर , दि. ०६ :- आईने आपल्या लहान बाळास एक चापट मारली मुलाला चापट का मारली असे पती ने आपल्या पत्नीस म्हंटले नेमका याच कारणा वरून दोघात जोरदार भांडण झाला वाद शमल्या नंतर रागाच्या भरात पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर हे पाहून पती ने ही विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली ही हृददायक मनन सुन्न करणारी घटना आज लातूर जिल्ह्यात घडली आहे .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी राम गुणाजी नरवते त्यांची पत्नी शालूबाई नरवते हे आपल्या तीन वर्षीय मुलांसह लातूर जिल्ह्यातील भटांगळी या गावात एक शेतात सालगडी म्हणून कामाला होते ते आनंदाने राहत होते मात्र आज राम नरवते यांनी आपल्या 3 वर्षीय चिमुकल्या मुलास रागाने एक थप्पड मारली या कारणा मुळे दोघा पती पत्नीत वाद झाला वाद एवढा विकोपाला गेला की पत्नी ने रागाच्या भरात गळफास घेतला हे पाहून पतीनेही विष प्राशन केला यात दोघांचाही मृत्यू झाला असून मात्र तीन वर्षीय चिमकला पार्थ अनाथ झाला आहे ही घटना घडल्या मुळे सर्वत्र दुःख वायकत केले जात आहे .