Home जालना मैत्रेय प्रकरणी लोकाधिकार परिषदेच्या वतीने शासनाच्या विरोधात ‘बांगड्या घाला आंदोलन’

मैत्रेय प्रकरणी लोकाधिकार परिषदेच्या वतीने शासनाच्या विरोधात ‘बांगड्या घाला आंदोलन’

122

जालना / लक्ष्मण बिलोरे

– लोकाधिकार परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी ,१९ फेब्रुवारी रोजी मैत्रेय प्रकरणी शासनाच्या दिरंगाईच्या विरोधात’ बांगड्या भरा आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकाधिकार परिषदेच्या महासचिव माया उके यांनी दिली.
मैत्रेय प्रकरण शासनाच्या गृहविभागाकडूनच निपटले जावू शकते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत.मैत्रेय गुंतवणूकदारांनी त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांनी आपसी मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे.आगामी निवडणूकांअगोदरच मैत्रेय प्रकरण शासनावर दबाव आणून संपवले पाहिजे.ही शेवटची लढाई आहे.लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून आपण हातावर हात ठेवून ,न्यायव्यवस्थेकडून न्याय मिळण्याची वाट बघत राहिलो तर पुढची पाच वर्षे लटकावे लागणार आहे.मैत्रेय प्रकरणात बैठका,मिटींगा घेवून नुसते फोटोसेशन करून काहीच हाती लागणार नाही.शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढावे लागणार आहे.तेव्हाच पिडित गुंतवणूकदार लोकांना न्याय मिळेल.देशातील न्यायपालिका नाहिशी झाल्यासारखी आहे.म्हणून मैत्रेय प्रकरणी न्यायालयाकडून अजिबात न्याय मिळणार नाही. किसान आंदोलक, मराठा आंदोलकांनी शासनाविरूद्ध आक्रमक लढा देवून आंदोलनापुढे सरकारला झुकविले आहे.मैत्रेय परतावे मिळविण्यासाठी ज्या संस्था, संघटना अस्तित्वात आहेत त्यांनी लोकाधिकार परिषदेच्या लढ्यात सहभागी व्हावे आणि आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम,महासचिव माया उके यांनी केले.