Home मराठवाडा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खाते सुरू करण्यासाठी ६ फेब्रुवारीला शिबिर…!!

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खाते सुरू करण्यासाठी ६ फेब्रुवारीला शिबिर…!!

95

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०५ :- भारत सरकार व्दारा संचलित इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक औरंगाबाद शाखेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 6 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी सात वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत 250 ठिकाणी बँक खाते उघउण्यासाठी शिबीरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे, प्रवर अधीक्षक डाकघर औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी कळविले आहे.

भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी शिबीर उपयुक्त ठरणार आहे. पेमेंट्स बँकेचे खाते उघडण्यासाठी केवळ आधार क्रमांक व मोबाइल क्रमांकाची आवश्यकता आहे. सुरूवातीला शंभर रूपयाने खाते उघडले जाणार असून हे खाते आधार संलग्न असल्यामुळे प्रधानमंत्री किसान योजना, मातृ वंदना योजना, गॅस सबसिडी व इतर डीबीटीचे मानधन या खात्यामध्ये जमा होऊ शकेल. या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन औरंगाबाद डाक विभागाचे प्रवर अधीक्षक यांनी केले आहे.