Home विदर्भ यवतमाळात दिवसा घरफोडी करणारे आरोपी जेरबंद….

यवतमाळात दिवसा घरफोडी करणारे आरोपी जेरबंद….

51
0

रवि माळवी

यवतमाळ , दि. ०५ :- माईदे चौक, स्टेट बँक ऑफ इंडयाच्या आवारातील रहिवासी बँकेचे मॅनेजर यांचे घर दिवसा चोरट्यांनी फोडून मुद्देमाल लाबंविल्याची घटना दिनांक ३०.१२.२०१९ रोजी घडली होती. सदर प्रकरणी पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती.
यवतमाळ शहरातील अवधुतवाडी हद्दीतील माईंदे चौक, स्टेट बँक ऑफ इंडीया चे आवारातील मॅनेजर हर्षल महाबूधे यांचे घरी दिनांक ३०.१२.२०१९ रोजी दिवसा घरफोडी झाली होती. यामध्ये चोरट्यांनी एक लॅपटॉप किंमत २६ हजार ५०० रुपये, एक मोबाईल किंमत २८ हजार रुपयाचा, चार घड्याळ किंमत ४ हजार रुपये , पॉवर बँक रुपये २ हजार, अमआय बॅन्ड १५०० रुपये असे एकुण ६२ हजार रुपयांचे साहीत्य लांबविले होते. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शखा यवतमाळ येथून समांतर तपास करत असतांना यातील चोरी करणारे अभिषेक अनिल गुंजाळ (१९ वर्ष) रा.साई मंदिरजवळ, यवतमाळ व एक विधीसंघर्षग्रस्त बालक असे दोघांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता चोरीचा मुद्देमाल हा मनिष भास्कर वड्डे (३०वर्षे) रा.आठवडी बाजार, जय भारत चौक, यवतमाळ, शेख मूजाहिद शेख मेहमूद (२८ वर्षे) रा. अशोक नगर, यवतमाळ, हरिओम गजानन बजाज उर्फ मुन्ना बजाज रा.कॉटन मार्केट, धामणगांव रोड, यवतमाळ यांना विक्री केला असता त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक (प्र.) नूरुल हसन सो, उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ श्रीमती माधूरी बाविस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिलन कोयल, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पूरी, ऋृषी ठाकूर, योगेश गटलेवार, बंडू डांगे, हरिष राऊत, जयंता शेंडे, गजानन हरणे, कु.रोशनी जोगळेकर, कु.प्रगती कांबळे, सुर्वेंद्र वाकोडे, गणेश देवतळे यांनी संयुक्तरित्या पार पाडली.
Unlimited Reseller Hosting