Home महत्वाची बातमी वाय.बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी चा विद्यार्थी उमर खान याने राष्ट्रीय स्तरावर GPAT परीक्षे मध्ये प्रथम क्रमांक (AIR-1) मिळविला.

वाय.बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी चा विद्यार्थी उमर खान याने राष्ट्रीय स्तरावर GPAT परीक्षे मध्ये प्रथम क्रमांक (AIR-1) मिळविला.

144

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०५ फेब्रुवारी २०२० वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी डॉ. रफिक जकारिया कॅम्पस रौझा बाग औरंगाबाद चा अंतिम वर्षाचा विद्यार्थी उमर खान मुसा खान याने राष्ट्रीय स्तरावर GPAT परीक्षे मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) च्या मार्गदर्शनाखाली GPAT – ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट हि परीक्षा दरवर्षी घेतली जाते. यावर्षी या परीक्षेत देशभरातील 48360 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि फक्त 4913 विद्यार्थी पात्र ठरले. सदर परीक्षा हि २ जानेवारी २०२० रोजी ऑनलाईन घेण्यात आली होती आणि ४ फेब्रुवारी २०२० रोजी याचा निकाल जाहीर झाला. वाय.बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी मधील 36 विद्यार्थी यात उत्तीर्ण झाले. प्रथम ३५२ विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थ्यांनी तर ६४८ विद्यार्थ्यांमध्ये ९ वाय.बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी आपले स्थान मिळवले. इतिहासात प्रथमच मराठवाडा विभागातील एका विद्यार्थ्याने अखिल भारतीय रँकिंगमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले आहे. वाय.बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. झहीद जहीर यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी ४ वर्षांपूर्वी एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समिती (CEGS) ची स्थापना केली होती. डॉ. मिर्झा शहेद बेग, डॉ.सबूर खान, श्री. इम्रान अनीस, मिस. बारावाझ अतिका, अस्लम अन्सारी (माजी विद्यार्थी) हि मंडळी प्राचार्य डॉ. झहीद जहीर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होती. अखिल भारतीय पातळीवर एक आकडा क्रमांक मिळविणे हे त्यांचे सुरुवातीपासून उद्दीष्ट असल्याचे डॉ. झहीद झहीर यांनी सांगितले. आज वाय.बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ओमर खान आणि इतर सर्व ३५ उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी डॉ. मकदूम फारुकी (डॉ. रफीक झकेरिया कॉलेज फॉर वूमन चे प्राचार्य), डॉ. मजहर फारुकी (मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य), डॉ. गुलाम रब्बानी (डॉ. रफिक झकेरिया सेंटर फॉर हायर लर्निंग चे संचालक) व डॉ. गालिब हुंडेकरी (कमला नेहरू कॉलेज ऑफ फार्मसीचे चे प्राचार्य) या सत्कार कार्यक्रमात उपस्थित होते. डॉ. झहीद झहीर यांनी स्वागत भाषणात CEGC सेल तसेच सर्व अध्यापन व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रांगणात शैक्षणिक वातावरण राखल्याबद्दल आभार मानले. डॉ. गालिब हुंडेकरी म्हणाले की, मी वाय.बी. चव्हाण कॉलेज चा सुरुवातीपासूनच एक भाग आहे याचा मला अभिमान आहे. सुरुवाती पासून वाय. बी. चव्हाण ऑफ फार्मसी चे विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत नाहीत तर ते सर्व प्रवाहात उत्कृष्ट आहेत. डॉ. मजहर फारुकीने यांनी या उत्कृष्ट दिनासाठी सर्व टॉपर्स विद्यार्थी आणि स्टाफ सदस्यांचे अभिनंदन केले. डॉ. मकदूम फारूकी म्हणाले की, या कॅम्पसमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण तसेच गुणवत्तेचे प्रमाण जास्त आहे. आणि आज ओमर खानने हे सिद्ध केले आहे की भाषा आणि शहर हि यश मिळविण्यामध्ये कधीही अर्थदा नसतात, कारण उमर चा शिक्षण हा उर्दू माध्यमातून झाला असून तो मराठवाड्याच्या दुर्गम भागातून येतो. या यश बद्दल त्यांनी महाविद्यालयातील सर्व कर्मचार्‍यांना देखील शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, आज जर डॉ. रफिक झकेरिया जिवंत असले असते तर खूप खुश झाले असते. त्यांनी पेरलेले बीज, हे आज शिक्षणाचे विशाल वृक्ष बनले आहे हे पाहून निश्चित प्रसन्न झाले असते. परमेश्वर त्यांच्या आत्मेस शांती देवो. या अप्रतिम यशाबद्दल त्यांनी पद्मश्री मॅडम फातिमा झकरिया यांचे देखील अभिनंदन केले. ओमर खानने भावनिकपणे आपल्या भावना प्रेक्षकांसमोर मांडल्या. त्याने सर्वप्रथम सर्वशक्तिमान देव, त्याचे पालक आणि शिक्षकांचे आभार मानले आणि त्याने सांगितले कि, हे यश केवळ कठीण परिश्रम केल्यामुळे शक्य झाले. आपल्या यशाचे रहस्य त्याने उघड केले की तो GPAT च्या परीक्षेसाठी दररोज ८ तास अभ्यास करायचा. वाई.बी. चव्हाण कॉलेज चे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या प्रतिष्ठेनिमित्त ओमर खान आणि सर्व टॉपर्सचे अभिनंदन केले.