Home मुंबई आरे च्या निसर्गरम्य 100 एकरात बुद्धिस्ट मोनेस्ट्री उभारणार. डॉ. राजन माकणीकर

आरे च्या निसर्गरम्य 100 एकरात बुद्धिस्ट मोनेस्ट्री उभारणार. डॉ. राजन माकणीकर

101

मुंबई  , (प्रतिनिधी) बुद्धभूमी मुंबईत आरे च्या निसर्गमय वातावरणात बुद्धिस्ट मोनेस्ट्री उभारणार असून 100 एकर जागेची मागणी राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथरावं शिंदे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन ईश्वर माकणीकर यांनी केली आहे.

दि बुध्दाज बोधी ट्री या संस्थेचे संस्थापक डॉ. माकणीकर म्हणाले की, भारत देश हा मूळ बुद्धाचा आणी धम्माचा जानला जातो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे देशातील महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगर आणी आजूबाजूचा परिसर लेण्यांनी व्याप्त आहे.
बुद्धाची शिकवण ही जगाला तारणारी आहे. त्यामुळे तथागत बुद्धाची शिकवण व संस्कृती आपण जोपासने आत्यावश्यक आहे.

बौद्धकालिन सुपारक म्हणजेच नाला सोपारा येथे तर प्रत्यक्ष तथागत गौतम बुद्ध आले होते. त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले होते. पण ती जागा मात्र आजही भग्नाअवस्तेत पडली असून स्थानिक लोकांना सुद्धा त्या जागेचा किंवा नालासोपऱ्याचा इतिहास आजही माहिती नाही. ही फार मोठी शासन व धम्म् बांधवांची शोकांतिका असल्याची खंत विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केली.

त्याच प्रमाणे जिथे नॅशनल पार्क जवळ कान्हेरी लेणीवर बौद्ध सम्राट अशोकाचे पाऊल पडले होते. त्यांच्या अनाहुत पाऊल् खुणा सुद्धा मुंबइकर विसरले मुंबई बेट म्हणजे बौद्ध कालीन शहरच होय. असा मनोदय डॉ. एम राजन यांनी व्यक्त केला.

बुद्ध धम्म आणी या दोघांचा संघ वाचवायचा असेल आणी आपल्या भारताची खरी संस्कृती जपायची असेल तर बुद्ध धम्म ज्ञान व शिकवणींचा चा प्रचार आणी प्रसार होने महत्वाचे असून
आरे कॉलोनी च्या जंगलात बरीच जाती धर्मांची श्रद्धास्थाने, प्रार्थनाघरे व देवी देवतांची मंदिरे उभारली गेली आहेत, त्याबद्दल आमचे दुमत नाही. परंतु याचं धरती वर आरे कॉलोनी परिसरात बुद्धिस्ट मोनेस्ट्री उभारण्यात यावी असा आमचा आग्रह आहे.

बुद्धाची अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुढाकार घ्यावा व आरे येथील घनदाट जंगलात बुद्धिस्ट मोनेस्ट्री साठी 100 एकर जागा देऊन देशाची खरी संपत्ती बुद्ध संस्कृती जपावी असा आग्रह आरपीआय संविधान पक्षाच्या वतीने पॅन्थर माकणीकर यांनी धरला आहे.

अर्जदार – डॉ. राजन माकणीकर

राष्ट्रीय महासचिव
RPI (संविधान)