Home पालघर मंदा रवींद्र गरेल यांना आदर्श अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद पालघर यांच्या तर्फे...

मंदा रवींद्र गरेल यांना आदर्श अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद पालघर यांच्या तर्फे पुरस्काराने सन्मानित

80

जव्हार :-सोमनाथ टोकरे

जव्हार तालुक्यातील नामवंत ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे पैकी टोकरखांड गावची अंगणवाडी सेविका श्रीमती मंदा रवींद्र गरेल यांना आज दिनांक 27 मार्च 2023 रोजी जिल्हा परिषद पालघर महिला व बालकल्याण विभाग यांचे आयोजित आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण सोहळा सन 2022-24 उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भानुदास पालवे, महिलाबालकल्याण सभापती रोहिणी शेलार, प्रवीण भावसार जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण विकास विभाग, डॉक्टर सूर्यवंशी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत मंदा रवींद्र गरेल यांना आदर्श अंगणवाडी म्हणून यांच्या हस्ते पुरस्कार सन्मानित करण्यात आला.
जव्हार तालुक्यामध्ये तसेच ग्रामपंचायत कौलाळे पैकी टोकरखंड या गावांमध्ये अंगणवाडी सेविका मंदा गरेल यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केल्याबद्दल महिला बाल कल्याण विभागाची वेळोवेळी प्रशिक्षण पूर्ण करून,कुपोषण घटनेचा प्रमाण कमी केले, अमृता आहार योजनेचा वेळोवेळी गरोदर मातांना अंगणवाडी मुलांना दिल्याबद्दल, सरकार नोंदी, मुलांची संख्या हजेरीपट पूर्ण, अंगणवाडी मुलांना चांगले प्रकारे शिकवणे, मुलांची स्वच्छता,अशा इत्यादीप्रकारे काम चांगले कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषद पालघर यांच्या हस्ते महिला बाल कल्याण विभाग यांच्या मार्फत आदर्श अंगणवाडीतील सेविका पुरस्कार सन्मानित करण्यात आले.