Home यवतमाळ न्यू इंग्लिश हायस्कूल कडून अपघात ग्रस्त खेडाळूस आर्थिक मदत

न्यू इंग्लिश हायस्कूल कडून अपघात ग्रस्त खेडाळूस आर्थिक मदत

78

राळेगाव  – न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, येथील वर्ग 12 वी ची विद्यार्थीनी कु स्नेहा राजू अक्कलवार ही विद्यार्थीनी राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धा , नागपूर येथे अंतिम सामन्यात खेळत असतांना गंभीर जखमी झाल्यामुळे तीला पुढील वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात भरती केले असतांना डॉक्टर च्या रिपोर्ट नुसार तीचे गळ्याचे ऑपरेशन करणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी अपेक्षित वैद्यकीय खर्च 2 लाख असल्यामुळे तिच्या गरीब कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला असून क्रीडा विभाग व शासनाच्या वतीने तीला कोणतीही आर्थिक मदत अदयाप न मिळाल्याने संस्थाचालक व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी 12500/- अशी आर्थिक मदत केली असून अशा भविष्यातील प्रतिभावान जखमी खेडाळू च्या ऑपरेशन साठी समाजातील दाते मंडळीनी समोर येऊन या विद्यार्थीनीची आर्थिक मदत करून वैद्यकीय उपचारासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा तीच्या कुटुंबातील सदस्यांनी केली आहे…..