Home पालघर नांदगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच रमेश कोरडे यांच्या प्रयत्नाने आरोग्य शिबिराचे आयोजन

नांदगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच रमेश कोरडे यांच्या प्रयत्नाने आरोग्य शिबिराचे आयोजन

72

जव्हार:-सोमनाथ टोकरे

जव्हार तालुक्यातील बहुचर्चित असलेली ग्रुप ग्रामपंचायत नांदगाव लोकनियुक्त सरपंच रमेश कोरडे यांच्या प्रयत्नाने 27 मार्च 2023 रोजी ठिकाण समाज मंदिर नांदगाव येथे भक्तिवेदांत हॉस्पीटल मीरा रोड,jsw फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर सकाळी 10.00 ते दुपारी 2.00वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे. शिबीरामध्ये मोफत औषधे , मोफत रक्त तपासणी, मोफत स्त्रियांची तपासणी, मोफत लहान मुलांची तपासणी, मोफत मोठ्या माणसांची तपासणी, बीपी, शुगर, वजन, उंची तपासली जाईल.तरी सर्व रूग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. ग्रुप ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामस्थांना आसपासच्या ग्रामस्थांना पीडित रुग्ण, महिला गरोदर माता, लहान बालके, तरुण-तरुणींनी सर्व पिढीत रुग्णांनी आरोग्य शिबिराचा पूर्णपणे लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच रमेश कोरडे यांनी आसपासच्या जनतेला केले आहे.