Home बुलडाणा त्याने चक्क आपल्याच पत्नीच्या घरात केली चोरी ,

त्याने चक्क आपल्याच पत्नीच्या घरात केली चोरी ,

66

 

बुलडाणा ,

अमीन शाह ,

पतीने आपल्याच आपल्याच घरात चोरी करून पत्नीचे नगदी व दागिने लंपास केल्याची घटना घडली होती या संदर्भात पत्नीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस तपासात पतीनेच आपल्या पत्नीचे दागिने लंपास केल्याचे उघळ झाले पोलिसांनी अवघ्या बारा तासात या चोरीचा छडा लावला व आरोपीस अटक केली ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार
धाड पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या मासरूल येथील कविता राजू कापरे यांनी धाड पोलिसात तक्रार दिली होती की माझ्या घरातून अज्ञात वयक्तीने 75 हजार रुपयांच्या रोख रकमेसह दिड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे या प्रकरणी दाखल तक्रारी वरून ठाणेदार मनीष गावंडे यांनी तपास करून अवघ्या बारा तासांत या चोरीचा छडा लावला ,
मसरूळ गावात एका दाम्पत्याच्या घरातून दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना 22 मार्च रोजी घडल्याची तक्रार पत्नी कविता राजू कापरे यांनी दिली होती पोलीस दलाने त्याचे निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना माहिती देऊन श्वान पथकाला पाचारण केले. त्यानंतर समजले की फिर्यादीचा पतीच या घटनेतील चोर आहे. त्याने सुरुवातीला तो मी नव्हेच या प्रमाणे पोलिसांना उडवा उडवि ची उत्तरे दिली मग पोलिसांनी त्याला खाकी ची पॉवर हवा दाखवली असता त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
राजू हिरालाल कापरे याने आपल्याच घरातून रोख रक्कम व दागिने चोरून शेतात पुरल्याचे सांगितले, पोलिसांनी रोख व दागिने जप्त केले आहे , आरोपीस अटक करण्यात आली
बुलढाणा पोलीस अधीक्षक सारंग आवाड अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, अशोक खरात व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त ठाणेदार मनीष गावंडे, त्यांचे सहकारी उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, पो.कॉ. कान. रवींद्र बर्‍हाटे, सुनील सोनुने, सुनील चौधरी, ईश्वर हावरे, शंकर वाघ यांनी केले. केलेल्या कार्यवाही मुळे पोलीस विभागाची प्रश्नसा केली जात आहे