Home पालघर मोहोच्या फुलापासून आदिवासी नागरिकांना रोजगार उपलब्ध…

मोहोच्या फुलापासून आदिवासी नागरिकांना रोजगार उपलब्ध…

48

पालघर जिल्हा हा पूर्णपणे अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जात असून या ठिकाणी सगळा भाग डोंगराळ असून या ठिकाणी नागरिक हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतात या ठिकाणी ९९% टक्के नागरीक हे आदिवासी वस्ती राहत असते.या ठिकाणी झाडे,जंगल सगळीकडे दाट असल्याने अनेक नैसर्गिक वनस्पती औषधी म्हणून आढळून येतात त्यापैकी एक मोहो हे वनस्पती खूप महत्त्वाचं आहे.साधारण होळी संपल्यानंतर या वनस्पती ला मोहोर येण्यास सुरुवात होते आणि या फुलासाठी आदिवासी नागरिक हे पहाटे,किंवा रात्री त्याठिकाणी जावून एक एक फुल एकत्र करून ते घरी घेवुन येतात.नंतर पूर्णपणे ते उन्हामध्ये वाळवतात आणि सुरक्षा ठिकाणी ठेवतात काही नागरिक हे या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये जावून विकत असतात.आणि त्यातून मिळालेल्या पैशातून कुटुंब चालवीत असतात.

परंतु या वर्षी सगळ्या महाराष्ट्रात भर वातावरण संतुलन बिघडले असून सगळ्या महाराष्ट्रात भर अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे.त्यामुळे या वनस्पतींचा सगळा मोहोर खाली पाडला गेल्यामुळे खूप नुकसान बघायला मिळत आहे.
“मोहों वनस्पतीपासून आपल्याला अनेक फायदे आहेत फुलावर प्रकिया करून त्यापासून औषधी बनविण्यात येतात त्यामुळे ही वनस्पती भविष्यात खूप महत्त्वाची ठरू शकते त्यामुळे सगळ्यांनी झाडे लावा व झाडे वाचवा.”( काशिनाथ बुधर रिठीपाडा ग्रामस्थ)