Home यवतमाळ राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

16
0

चंद्रपूर/नागपूर/यवतमाळ – राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर* यांच्या पदास केंद्रीय गृहमंत्रालय द्वारे जारी पत्राद्वारे कॅबिनेट मंत्रीपदाचा समकक्ष दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून महामहिम राष्ट्रपतींनी दि 02 डिसेंबर 2022 रोजी त्यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. आता या पदास केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा लागू करण्यात आला आहे.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हंसराज अहीर यांनी देशातील विविध राज्यातील ओबीसी प्रवर्गातील शासकीय, निमशासकीय, उद्योग, विविध कंपन्या, कोळसा खाण क्षेत्रातील ओबीसी अधिकारी, कर्मचारी, कामगारांचा अनुशेष, रोष्टरनुसार भरण्याकरीता सुनावणीद्वारा आढावा घेतांनाच ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक व रोजगार विषयक प्रश्नांबाबत अत्यंत जागरुकतेेने कार्य करीत आहे. ओबीसींच्या संवैधानिक अधिकारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने ते प्रभावीपणे कार्यरत आहेत.
हंसराज अहीर यांनी यापूर्वी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे 4 वेळा प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, खासदारकीच्या कार्यकाळात कोल व स्टील सह अन्य संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदावर उल्लेखनीय कार्य केले आहे. 16 व्या लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री तसेच उर्वरक व रसायन मंत्री या पदांचे निर्वहन सुध्दा त्यांनी प्रभावीपणे केले आहे.
कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल झाल्याबद्दल हंसराज अहीर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous articleमुलगी झाली म्हणून पती भांडला अन , विपरितच घडलं ,?
Next articleपारवा येथील स्व. आबासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत योगेश देशमुख पारवेकर यांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश..!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here