Home अकोला मुलगी झाली म्हणून पती भांडला अन , विपरितच घडलं ,?

मुलगी झाली म्हणून पती भांडला अन , विपरितच घडलं ,?

27
0

 

 

अमीन शाह

मुलगी का झाली म्हणून पतीने दवाखान्यातच पत्नी सोबत भांडण केल्याने रागाच्या भरात पत्नीने
अकोला जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात
बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकिस आली आहे घडलेल्या घटने मुळे संताप व्यकत केला जात आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी वार्ड क्रमांक २३ च्या शौचालयातून दुर्गंधी येत असल्याने ही बाब उघडकीस आली. कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने तीन दिवसांपासून शौचालयात असलेला तिचा मृतदेह कुणाच्याच लक्षात आला नव्हता. या महिलेने ३ मार्चला एका मुलीला जन्म दिला. मुलीवर जन्मानंतर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मुलीच्या जन्मानंतर तिची सासरच्या मंडळीकडून छळवणूक सुरू असल्याने ती तीन दिवसांपासून गायब होती. लग्नानंतर तब्बल पाच वर्षांनी गोदावरी पहिल्यांदाच गर्भार राहिली. मात्र, घरी सासू आणि पतीचा मुलगा झाला पाहिजे, यासाठी चा अटाहास होता. ३ मार्चला तिने अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला.
दिनांक ६ मार्चला तिला रूग्णालयात भेटायला आलेल्या तिच्या पतीने तिच्यासोबत मुलगी झाल्यामुळे वाद घातल्याची माहिती आहे. यानंतर सासू आणि पतीच्या मानसिक छळामूळे ती तीन दिवसांपूर्वी अचानक गायब झाली. पोलिसांमध्ये ती हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली. आज वार्ड क्रमांक २३ च्या शौचालयातून दुर्गंधी येत असल्याने दार तोडण्यात आले, तेंव्हा गोदावरीचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला. त्यानंतर रूग्णालयात एकच खळबळ उडाली. गोदावरीने तिच्याच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे सिटी कोतवाली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी सांगितले.

Previous articleकाँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला धुतले
Next articleराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here